‘स्टिव्हन स्पिलबर्ग’ हे जगातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांपैकी एक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांची निर्मिती करणं, अफाट लोकप्रियता मिळवणं, प्रचंड धनदौलत प्राप्त करणं, हे सिनेसृष्टीत करिअर करु इच्छिणाऱ्या प्रत्येक नव्या कलाकाराचं स्वप्न असतं. परंतु ‘स्टिव्हन स्पिलबर्ग’ यांच्या मुलीची मात्र ती इच्छा नाही. तिला अभिनेत्री तर व्हायचयं पण ते पॉर्न चित्रपटांची.

अवश्य पाहा – रुपेरी पडद्यावर ‘सविता भाभी’ साकारणारी पहिली अभिनेत्री

होय, जगातील सर्वात मोठ्या दिग्दर्शकाच्या मुलीला पॉर्नस्टार व्हायचे आहे. ‘स्टिव्हन स्पिलबर्ग’ यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा धक्कादायक खुलासा केला.

अवश्य पाहा – छत्रपती शिवाजी महाराजांचं हस्ताक्षर कसं होत? पाहा त्यांनी स्वत:च्या हातांनी लिहिलेलं पत्र

अवश्य पाहा – रणबीर चांगला मुलगा आहे पण… ; लग्नाच्या प्रश्नावर आलियाची गुगली

काय म्हणाले स्पिलबर्ग?

‘स्टिव्हन स्पिलबर्ग’ यांच्या मुलीचं नाव मिकेल असं आहे. ती २३ वर्षांची आहे. मिकेल १२ वर्षांची असताना स्पिलबर्ग यांनी तिला दत्तक घेतले होते. “तिला सर्वसाधारण प्रकारचे चित्रपट आवडत नाही. तिचा कल पॉर्न चित्रपटांच्या दिशेने आहे. खरं तिला जगातील सर्वात लोकप्रिय पॉर्नस्टार होण्याची इच्छा आहे. सुरुवातीला जेव्हा तिने मला हे सांगितले, तेव्हा ती थोडा आवाक् झालो. परंतु मला तिच्या स्वप्नांचा आड यायचे नाही. किंबहूना माझा तिला पूर्ण पाठिंबा आहे. जगातील कुठल्याही क्षेत्रात करिअर करण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि महत्वकांक्षा असावी लागते. आणि अशी जिद्द माझ्या मुलीमध्ये देखील आहे.” असं स्पिलबर्ग द सन या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

कोण आहेत स्टिव्हन स्पिलबर्ग?

‘स्टिव्हन स्पिलबर्ग’ हे जगातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांपैकी एक म्हणून ओळखले जातात. ‘इटी द एक्स्ट्रा टेरेस्टिअल’, ‘सेव्हिंग प्रायव्हेट रायन’, ‘ज्युरासिक पार्क’, ‘कॅच मी इफ यू कॅन’ यांसारख्या अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या स्पिलबर्ग यांनी संपूर्ण सिनेसृष्टीचा चेहरामोहराच बदलून टाकला. एक दिग्दर्शक देखील चित्रपटाचं मुख्य आकर्षण ठरु शकतं हे स्पिलबर्ग यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिले. अशा या जगातील सर्वात मोठ्या दिग्दर्शकाच्या मुलीला पॉर्नस्टार व्हायचे आहे हे ऐकून त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.