बिग बॉस १४ ची विजेती रुबीना दिलैकने १ मे रोजी करोना पॉझिटिव्ह झाल्याची माहिती दिली होती. ही माहिती कळल्यानंतर तिचे चाहते तिच्यासाठी चिंतेत होते. नुकतंच अभिनेत्री रुबीना दिलैक हीने एक व्हिडीओ शेअर करत एक आनंदाची बातमी दिली आहे आणि तिच्या तब्बेतीत सुधारणा होत असल्याचं देखील तिने सांगितलं आहे.
७० टक्के बरी झाली रुबीना
रुबीनाने काही वेळापूर्वीच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमधून ती स्वतःची हेल्थ अपडेट देताना दिसून आलीय. रुबीना व्हिडीओमध्ये म्हणतेय, “हॅलो, माझ्या लाडक्या मित्र-मैत्रिणींनो…तुमच्यासाठी एक छोटीशी अपडेट…मला आता पहिल्यापेक्षा जास्त बरं वाटतंय…आणि मी ७० टक्के बरी देखील झालेय…माझ्या तब्बेतीत सुधारणा होऊ लागली आहे…यासोबतच तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी खूप खूप आभार…आणि तुम्ही केलेल्या प्रार्थनेसाठी खूप धन्यवाद…!”.
View this post on Instagram
चाहत्यांना म्हणाली, “धन्यवाद!”
या व्हिडीओमध्ये रुबीना पुढे म्हणाली, “तुम्हा सर्वांचे मी मेसेजेस वाचले…तुम्ही सर्वांनी सोशल मीडियावर माझ्यासाठीचं जे प्रेम व्यक्त केलं…ते सर्व माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे…हे प्रेमच माझ्यासाठी माझं जग आहे…माझ्या तब्बेतीत आता सुधारणा होतेय आणि हे फक्त तुम्ही केलेल्या प्रार्थनेमुळेच शक्य झालंय….माझे आई-वडील, मित्र-मैत्रिणी, माझं कुटूंब आणि माझे प्रेमळ पती….हे सर्व जण त्यांच्याकडून जितकी शक्य होईल तितकी साथ देत राहिले…तुम्ही माझ्यावर करत असलेल्या प्रेमासाठी खूप आभार….आणि सर्वांना ईदच्या खूप खूप शुभेच्छा…”.
View this post on Instagram
अभिनेत्री रुबीना दिलैक सध्या शिमलामध्ये होम क्वारंटाईन आहे. अभिनेत्री रुबीना कायम स्वतः सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करत असते. तिला करोना झाल्याची बातमी शेअर करताना सुद्धा तिने अगदी सकारात्मक पद्धतीने सांगितली. रुबीनाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं, “मी प्रत्येक गोष्ट सकारात्मकतेनेच पाहते…आता एक महिन्यानंतर करोनातून बरी होऊन प्लाझ्मा दान करू शकणार आहे…करोनाने संक्रमित झाले आहे…पुढचे १७ दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहणार आहे. गेल्या ५-७ दिवसांत जे जे माझ्या संपर्कात आले होते, त्यांनी कृपया स्वतःची टेस्ट करून घ्या !.”