‘तेंडुलकरांचे साहित्य कोणत्याही माध्यमात सहजपणे रूपांतरीत करता येते. मानसशास्त्र समजून घ्यायचे असेल तर तेंडुलकराच्या पात्राचा अभ्यास करण्यासारखा आहे. कारण त्यांच्या साहित्यातून ‘माणूस’ समजतो. नाना फडणवीसदेखील एक वृत्तीच आहे’’, या शब्दांत व्यक्त होत ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी ज्येष्ठ लेखक विजय तेंडुलकर यांच्याबद्दलचे वैशिष्ट्य सांगितले. ‘स्टोरीटेल’ या ऑडियो बुक संस्थेच्या वतीने आयोजित ‘तें – एक श्राव्य अनुभव’ नावाचा विजय तेंडुलकर ऑडियो नाट्य महोत्सव नुकताच स्टोरीटेलवर प्रकाशित करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते.

स्टोरीटेल आयोजित या उपक्रमाचा भाग म्हणून तयार करण्यात आलेला ‘वारसा तेंचा’ हा ज्येष्ठ दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेला लघुपटही स्टोरीटेलवर प्रकाशित करण्यात आला. पंचेचाळीस मिनिटांच्या या लघुपटात विजय तेंडुलकर यांच्या नाटकांचे वैशिष्ट्यं, आजही नव्या पिढीतील दिग्दर्शकांना त्यांच्या नाटकांबद्दल वाटणारे आकर्षण, स्टोरीटेलवर ऑडियो रूपात ही नाटके सादर करत असताना आलेले अनुभव, विजय तेंडुलकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा तसेच साहित्याचा समीक्षेच्या अंगाने घेतलेला आढावा मान्यवरांनी या लघुपटातून श्रोत्यांसमोर पेश केला आहे. सुप्रसिद्ध अभिनेते मोहन आगाशे, संदीप पाठक, दिग्दर्शक विजय केंकरे, प्रतिमा कुलकर्णी, अक्षय शिंपी, समीक्षिका रेखा इनामदार-साने, राजीव नाईक, राजू परुळेकर आदींनी या लघुपटात सहभाग घेतला आहे.

Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण
Nita ambani in paithani
Video: पैठणी, चंद्रकोर अन् मराठमोळा साज! NMACC च्या वर्षपूर्ती कार्यक्रमात नीता अंबानी मराठीत म्हणाल्या…
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

‘ते’ मराठी नाटक पाहिलं आणि कुणीतरी तोंडात मारल्यानं खुर्चीखाली पडल्यासारखं वाटलं : जावेद अख्तर

या महोत्सवानिमित्त ‘सखाराम बाईंडर’, ‘अशी पाखरे येती’, ‘बेबी’, ‘कमला’, ‘शांतता! कोर्ट चालू आहे!’, ‘कन्यादान’, ‘कावळ्यांची शाळा’ या तेंडुलकरांच्या अजरामर नाट्य कलाकृती स्टोरीटेलवर ऑडियो नाटकांच्या स्वरूपात नाट्यरसिकांसाठी प्रकाशित झाल्या आहेत. या नाटकांपैंकी ‘सखाराम बाईंडर’, ‘बेबी’, ‘कन्यादान’ आणि ‘शांतता! कोर्ट चालू आहे!’ या नाटकांचे दिग्दर्शन मंगेश कदम यांनी केले असून ‘कावळ्यांची शाळा’ या नाट्यकृतीचे दिग्दर्शन प्रतिमा कुलकर्णी यांनी केले आहे. विजय तेंडुलकर ऑडियो नाट्य महोत्सवातील नाटकांचे अभिवाचन अभिनेते संदीप पाठक, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, चिन्मयी सुमीत, अदिती देशपांडे, आनंद इंगळे, अमिता खोपकर, लीना भागवत, स्पृहा जोशी, अद्वैत दादरकर, मंगेश कदम, सुहास शिरसाट, पुंडलिक धुमाळ, राजन भिसे, पुष्कराज चिरपुटकर, डॉ. शिरीष आठवले, विश्वास जोशी, शैलेश दातार, शर्वरी पाटणकर, दुष्यंत वाघ, अक्षय शिंपी, शिरीष जोशी, संजय देशपांडे, जितेंद्र आगरकर, धनश्री खांडकर, भूषण गमरे, रोहित मोरे, धनश्री करमरकर आदी कलावंतांनी केले आहे.

तेंडुलकरांच्या नाटय़भूमीची पाळेमुळे

संगीत संकल्पना आणि संपूर्ण आखणी तसेच आयोजन स्टोरीटेलचे निर्मिती प्रमुख राहुल पाटील यांचे आहे. स्टोरीटेलवर ३९९ रुपये वार्षिक सवलतीत या ऑडियो नाटकांचा आस्वाद नाट्यरसिक घेऊ शकतात. या महोत्सवाला अभिनेते पुष्कर श्रोत्री, ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, ज्येष्ठ दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी, लेखक दिग्दर्शक मंगेश कदम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.