सुप्रसिद्ध गायिका, अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्ती ही सोशल मीडियावरील तिच्या पोस्टमुळे बऱ्याचवेळा चर्चेत असते. सुचित्रा आणि शेखर कपूर यांनी १९९७ साली लग्न केलं आणि ते २००६ साली विभक्त झाले. त्या दोघांना एक मुलगी असून तिचं नाव कावेरी आहे. कावेरी देखील एक गायक आहे. लवकरच ती अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. कावेरी सध्या आई सूचित्रा सोबत राहते. सुचित्रा कावेरीला एकटं वाढवते. त्यामुळे कावेरीने एकदा चक्क तिच्या आईचं जबरदस्ती डेटिंग अॅपवर प्रोफाईल बनवलं होतं.
याविषयी सुचित्राने नुकत्याच दिलेल्या मुलाखती वक्तव्य केलं आहे. “मी एक पालक म्हणून खूप सजग आहे, जेणेकरून मुलीकडून कोणतीही चुकीची गोष्ट घडणार नाही याकडे मी पूर्ण लक्ष ठेवते. काही बाबतीत माझे विचार खूप जुने आहेत. पण मुलीला वचन दिल्या कारणानं मी माझ्यावर जी काही बंधन घालून घेतली होती त्यांच्यातून मी स्वत: ला बाहेर पडायला भाग पाडलं.”
आणखी वाचा : सोनम कपूरच्या बेबी शॉवरमधील गायक लियो कल्याणचा ‘तो’ फोटो पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल, म्हणाले…
आणखी वाचा : ऐश्वर्याच्या पासपोर्टचा फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल, नेटकरी म्हणाले…
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुचित्रा म्हणाली होती की, “माझी मुलगी कावेरीनं मला पहिल्यांदा डेटिंग App ची ओळख करुन दिली. मी तिला वचन दिलं होतं म्हणून मला होकार द्यावा लागला. पण त्यानंतर मात्र माझं मन तयार होईना. शेवटी मुलीला म्हटलं,’बच्चा,हे माझं काम नाही’. तिने माझं ऐकल नाही आणि माझं प्रोफाईल डेटिंग App वर बनवल आणि डेटवर जाण्याची जबरदस्ती करायला लागली. तिने माझे फोटो देखील तिथे अपलोड केले होते, पण त्यानंतर खूप विचित्र मेसेज यायला लागले.”
आणखी वाचा : “आयुष्यात लाईफ पार्टनर नाही आणि आता या टप्प्यावर…”, करण जोहरने व्यक्त केली खंत
सुचित्रानं हे देखील सांगितलं की, “शेखर कपूर पासून वेगळं झाल्यावर ती एका रिलेशनशीपमध्ये होती, जे एक वर्ष चाललं. पण याबाबतीत कोणाला काहीच माहिती नाही.” दरम्यान, कावेरी लवकरच अमरिश पुरी यांचा नातू वरधान पुरीसोबत चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.