लेखिका, इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आणि ब्रिटेनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सासूबाई सुधा मुर्ती या कोणत्या ना कोणत्या कारणाने कायम चर्चेत असतात. अलीकडेच त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत त्या गाणं गुणगुणत डान्स करताना दिसत आहेत.

प्रसिद्ध लेखिका आणि समाजसेवी सुधा मूर्ती यांचा गायिका श्रेया घोषालबरोबरचा ‘बरसो रे मेघा’ या गाण्यावर नाचताना आणि गातानाचा व्हिडिओ इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ १४ डिसेंबर रोजी बेंगळुरू येथे इन्फोसिसच्या एका कार्यक्रमातला आहे. यात त्यांनी श्रेयासह आणखी काही लोकांच्या उपस्थितीत गाणं गायलं आणि डान्स केला.

“मी अरबाजच्या कुटुंबासाठी कधीच….” घटस्फोटाच्या इतक्या वर्षांनी मलायका अरोराचं खान कुटुंबाबद्दल वक्तव्य

श्रेया सुश नावाच्या एका युजरने ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्या २००७ मध्ये आलेल्या ‘गुरू’ चित्रपटातील लोकप्रिय गाणं ‘बरसो रे मेघा’ श्रेया घोषालबरोबर उत्साहात आणि आनंदात गाताना दिसत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, इन्फोसिस कंपनीला ४० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त बंगळुरूमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या कार्यक्रमात श्रेया घोषालसह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. याच कार्यक्रमात सुधा मुर्ती यांना गाणं म्हणायचा आणि डान्स करण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद लुटल्याचं व्हिडीओतून दिसून येतंय.