‘सुखं म्हणजे नक्की काय असतं!’ या मालिकेत देवकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मिनाक्षी राठोड ही काही दिवसांपूर्वीच आई बनली आहे. मिनाक्षी आणि अभिनेता कैलास वाघमारे यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे. सध्या ते दोघेही पालकत्वाचा आनंद घेताना दिसत आहे. कैलास वाघमारे आणि मिनाक्षी यांचे हे पहिले अपत्य आहे. त्यामुळे ते दोघेही फार आनंदित असल्याचे दिसत आहे. नुकतंच कैलासने लेकीसोबत खेळतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

कैलास वाघमारे हा इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असतो. तो नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. नुकतंच कैलास वाघमारे याने नुकतंच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत कैलास हा लेकीला हातात घेऊन खेळताना दिसत आहे. यात तो थोडासा भावूक झाल्याचेही पाहायला मिळत आहे.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका रंजक वळणावर, नेहा आणि यशचा साखरपुडा लवकरच पार पडणार

या व्हिडीओला त्याने फार एका गाण्याचे लिरिक्स कॅप्शन म्हणून दिले आहेत. त्यासोबत त्याने ‘मुलीसाठी नाव सुचवा’ असेही म्हटले आहे. त्याच्या या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत त्याच्या मुलीसाठी नाव सुचवली आहेत. तर काहींनी त्याला शुभेच्छाही दिल्या आहेत.

‘सात संमदर पार’ गाण्यावर नोरा फतेहीने केली लावणी, व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान अभिनेत्री मिनाक्षी राठोड ही ‘सुखं म्हणजे नक्की काय असतं!’ या मालिकेत देवकीची भूमिका साकारत आहे. तिने प्रेग्नेंसीच्या काळातही मालिकेचे शूट केले होते. सध्या तिने या मालिकेतून ब्रेक घेतला आहे. मिनाक्षीचा पती कैलास वाघमारे हा देखील एक अभिनेता आहे. कैलासने ‘तान्हाजी’ या चित्रपटात चुलत्याची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेमुळे तो घराघरात प्रसिद्ध झाला.