टीव्हि क्षेत्रातला उत्तम अभिनेता, विनोदी कलाकारांपैंकी एक म्हणजे सुनील ग्रोव्हर. कॉमेडियन सुनील ग्रोव्हरला ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ या शो मधून प्रसिद्धी मिळाली. त्याने आजवर भरपूर भूमिका साकारल्या पण त्याची गाजलेली भूमिका म्हणजे ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ मधील ‘गुत्थी आणि रिंकु भाभीची’. आपल्या कॉमेडी टाइमिंगमुळे त्याने लाखो प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्याचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.

सुनील ग्रोव्हरने सुरू असलेल्या वादामुळे बऱ्याच वर्षांपूर्वी ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’या शोचा निरोप घेतला होता. मात्र गुत्थी आणि रिंकु भाभीची भूमिका अजूनही प्रेक्षक विसरलेले नाहीत. अजून ही या पात्रांना तेवढचं प्रेम मिळताना दिसते. बरं फक्त प्रेक्षकचं नव्हे तर सुनील सुद्धा आपल्या गुत्थी आणि रिंकु या पात्रांना मिस करताना दिसतो. ‘ईटाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या गोष्टीचा खुलासा केला. त्याला जेव्हा आठवण येते तेव्हा तो ते कपडे परिधान करून आरश्या समोर उभा राहतो असे त्यांनी मुलाखतीत सांगितले.

सुनीलने सांगितले की “जेव्हा घरी सगळे झोपतात तेव्हा मी तो गणवेश परिधान करतो आणि आरश्या समोर उभा राहतो. हा माझा जतन केलेला खजिना आहे. हे कपडे घातल्यावर माझ्या जुन्या आठवणी ताज्या होतात. या भूमिकेसोबत या कार्यक्रमा बरोबर माझ्या बऱ्याच आठवणी आहेत, ज्या मी कधीच विसरू शकणार नाही.राहीला प्रश्न कपिल बरोबर काम करण्याचा? तर जर का काही वेगळी कॉन्सेप्ट असेल तर मला काम करायला नक्कीच आवडेल”असे ही त्याने सांगितले.

पुढे आपल्या प्रवासाबद्दल बोलताना ‘तांडव’ अभिनेता सुनील म्हणाला की त्यानी पण या क्षेत्रात स्ट्रगल केले आहे. सुरवातीला बऱ्याच अडचणी आल्या होत्या. आपल्या स्ट्रगल बद्दल बोलताना त्यांनी सांगितले की “सुरवातीच्या काळात बऱ्याच शो मधून त्याला रातो रात रिप्लेस केले गेले.  मला स्वतःवर डाऊट येत होता. नंतर जवळजवळ ७ ते ८ वर्ष मी व्हाॅइस ओव्हरचे काम केले आणि त्यानंतर मला अभिनयासाठी ऑफर यायला लागल्या. त्यामुळे मलापण तेवढेच कष्ट करावे लागले आणि मी पण सगळ्यांन एवढीच मेहेनत घेतली आहे असं त्याने मुलाखतीत सांगितले.

दरम्यान सुनील ग्रोव्हरचा नुकतीच प्रदर्शित झालेली ‘सनफ्लाॅवर’ या वेब सिरीजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.  सुनील ग्रोव्हर भूमिकेला पण प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते आहे.