कॉमेडियन सुनील ग्रोवरचा देशभरात मोठा चाहतावर्ग आहे. कपिल शर्मा शोमधून त्याला बरीच लोकप्रियता मिळाली. पण नंतर कपिल शर्माशी वाद झाल्यानंतर सुनील ग्रोवरने या शोला रामराम ठोकला. पण सोशल मीडियाद्वारे सुनील ग्रोवर चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसतो. अनेकदा त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. पण आता त्याचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. ज्याची बरीच चर्चा आहे. या व्हिडीओत सुनील ग्रोवर रस्त्याच्या कडेला शेंगदाणे विकताना दिसत आहे.

सुनील ग्रोवरचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकजण हैराण झाले आहेत. त्याला अशाप्रकारे रस्त्याच्या कडेला शेंगदाणे विकताना पाहिल्यानंतर अनेक युजर्सनी कमेंट्समध्ये त्याच्यावर अशी वेळ का आली? असं विचारलं आहे. कपिल शर्माशी वाद झाल्यानंतर सुनील ग्रोवरवर शेंगदाणे विकण्याची वेळ आली असं काहींनी म्हटलं आहे. पण असं काहीच घडलेलं नाही. हा सुनीलचा चाहत्याचं मनोरंजन करण्याचा अनोखा अंदाज आहे. हा व्हिडीओ स्वतः सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सुनील ग्रोवरने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं, “खाओ, खाओ, खाओ” या व्हिडीओमध्ये सुनील ग्रोवर रस्त्याच्या कडेला असलेल्या शेंगदाण्याच्या दुकानात जाऊन शेंगदाणे भाजताना दिसत आहे. एवढा मोठा सेलिब्रेटी असूनही अशाप्रकारे शेंगदाणे विकत असल्याचं पाहून सर्वांना आश्चर्य वाटत आहे. त्याच्या या व्हिडीओवर अनेक युजर्सनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिलं, “विचार करा तुम्ही शेंगदाणे घ्यायला जाता आणि तिथे तुम्हाला सुनील ग्रोवर भेटतो.”

आणखी वाचा- सुनील ग्रोवर अमिताभ बच्चन यांच्या वारंवार पाया पडला; कारण दडलंय या व्हिडीओमध्ये, एकदा पाहाच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुनील ग्रोवरच्या या व्हिडीओवर कमेंट करताना काही युजर्सनी त्याच्या या साधेपणाचं कौतुक केलं आहे. काहींनी त्याला रिअल स्टार म्हटलं आहे तर काहींनी मात्र त्याच्यावर टीका केली आहे एका युजरने म्हटलंय, “कपिल शर्मा शो सोडल्यानंतर अशी वेळ आली.” दुसऱ्या एका युजरने लिहिलं, “खाणार तर, पण आधी शेंगदाणे नीट भाजा तरी सुनील जी.” दरम्यान सुनील ग्रोवरच्या कामाबद्दल बोलायचं तर कपिल शर्मा शो सोडल्यानंतर आपल्या बॉलिवूड करिअरवर लक्ष केंद्रित केलं आहे. तो अखेरचा ‘गुडबाय’ चित्रपटात दिसला होता.