भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल हा गेल्या काही दिवसांपासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. सगळ्यात आधी टीम इंडियाच्या सतत होणाऱ्या पराभवामुळे त्याच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले जात होते. दरम्यान, आता त्याच्या आणि अथिया शेट्टीसोबत त्याच्या लग्नाच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. अथिया शेट्टी ही बॉलिवूड अभिनेते सुनील शेट्टी यांची मुलगी आहे. अथियाच्या लग्नाची बातमी जेव्हा सुनील यांनी वाचली तेव्हा त्यांनी ही खोटी बातमी आहे, असं सांगत त्या वेबसाईटला ट्रोल केलं आहे.

सुनील शेट्टी हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात असतात. बऱ्याच वेळा त्यांनी केलेल्या पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. नुकतीच सुनील यांनी अथिया आणि राहुल २०२२ मध्ये लग्न करणार असल्याची बातमी ‘बॉलिवूड हंगामा’ या वेबसाइटवर वाचली. ही बातमी वाचल्यानंतर त्यांनी या वेब साइटला ट्रोल केले आहे.

आणखी वाचा : “…कारण माझे ब्रेस्ट मोठे नाहीत”, नीना गुप्ताच्या उत्तराने कपिल शर्माची बोलती बंद

सुनील यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. “मी हे बातमी वाचली आणि मला कळलचं नाही की मी आनंदी होऊ की दुःखी. मला कळत नाही की सत्य काय आहे ते माहिती नसताना कोणी अशी बातमी कशी देऊ शकतं. अशा बेजबाबदार रिपोर्टिंमुळे पत्रकारितेचे नाव खराब होतं आहे. ‘बॉलिवूड हंगामा’ तुम्ही अशा बातम्या कसे देऊ शकतात,” अशी पोस्ट सुनील शेट्टी यांनी ती बातमी शेअर करत केली आहे.

आणखी वाचा : …म्हणून अल्लू अर्जुनची ‘पुष्पा’ बनली मराठी व्यक्तिरेखा; श्रेयस तळपदेन केला खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, राहुल आणि अथियाने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ते रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा केला. त्यांनी दिलेली ही बातमी ऐकल्यानंतर त्या दोघांच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला होता. या आधी अथिया बऱ्याचवेळा राहुलसोबत दिसली आहे. एवढचं काय तर राहुलची मॅच असेल तर अथिया त्याला सपोर्ट करण्यासाठी तिथे पोहोचायची.