Sunita Ahuja and Govinda Living Separately for Past 15 Years : गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाच्या अफवा काही काळापासून पसरत आहेत. सुनीता यांनी त्यांचा पती गोविंदापासून घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केल्याचा दावाही करण्यात आला होता. गणेश चतुर्थीच्या दिवशी गोविंदा आणि सुनीता यांनी घटस्फोटाच्या अफवांचे खंडन केले आणि ते एकत्र असल्याचे सांगितले. आता सुनीता पुन्हा एकदा गोविंदाबरोबरच्या त्यांच्या लग्नाबद्दल बोलल्या आहेत; परंतु एक धक्कादायक खुलासाही त्यांनी केला आहे.
सुनीता आहुजा यांनी अलीकडेच त्यांच्या व्लॉगमध्ये हे सर्व शेअर केले आहे. गोविंदा आणि सुनीता यांचे लग्न १९८७ मध्ये झाले. त्यांना दोन मुले आहेत. मुलगा यशवर्धन, जो चित्रपटांमध्ये प्रवेश करीत आहे आणि मुलगी टीना, जी चित्रपटांमध्येही काम करते.
सुनीता आहुजा काय म्हणाल्या?
गोविंदाबरोबरच्या त्यांच्या वैवाहिक जीवनातील आणि नात्यातील तणावाबद्दल सुनीता म्हणाल्या, “समस्या अशी आहे की, त्याच्या कुटुंबात असे लोक आहेत, ज्यांना मी आणि गोविंदा एकत्र नको आहे. त्यांना आश्चर्य वाटते की, आमचे कुटुंब इतके आनंदी कसे. गोविंदा चांगल्या लोकांशी संबंध ठेवत नाही. म्हणून मी म्हटल्याप्रमाणे, जर तुम्ही वाईट लोकांबरोबर राहिलात, तर तुम्हीही तसेच व्हाल. आज, माझे फ्रेंड सर्कल नाही; माझी मुलेच माझे मित्र आहेत.”
गोविंदा आणि मी १५ वर्षांपासून वेगळे राहत आहोत : सुनीता आहुजा
सुनीता गोविंदापासून वेगळे होण्याबद्दल म्हणाल्या, “ची ची आणि मी १५ वर्षांपासून समोरासमोर राहत आहोत; पण तो घरी येत राहतो. जो कोणी चांगल्या स्त्रीला दुखावतो, तो कधीही आनंदी राहत नाही. तो नेहमीच अस्वस्थ राहील. मी माझे संपूर्ण आयुष्य त्याला दिले, बालपणापासून सुरुवात केली आणि मी अजूनही त्याच्यावर खूप प्रेम करते. मी नाराज आहे आहे. कारण- मी ऐकत आहे. पण, मी खूप मजबूत आहे. कारण- मला माझी मुले आहेत.”
गणेश चतुर्थीला जेव्हा सुनीता गोविंदाबरोबर दिसल्या तेव्हा त्यांनी त्यांच्या घटस्फोटाच्या अफवा पसरवणाऱ्यांवर टीका केली. सुनीता म्हणालेल्या, “कोणीही आम्हाला वेगळे करू शकत नाही, मग ते कोणीही असो.”