Karisma Kapoor ex husband Sunjay Kapur Death : बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचे पूर्वाश्रमीचे पती आणि उद्योगपती संजय कपूरचे वयाच्या ५३ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तो इंग्लंडमध्ये होता आणि एका क्लबमध्ये पोलो खेळत होता.
इंग्लंडमधील एका क्लबमध्ये पोलो खेळत असताना तो अचानक जमिनीवर पडला, त्यानंतर त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. पण त्याला वाचवता आले नाही. संजय कपूर हा एक प्रसिद्ध उद्योगपती होता.
करीश्मा कपूर आणि संजय कपूर यांचे लग्न २००३ मध्ये झाले. या जोडप्याची मुलगी समायरा २००५ मध्ये जन्मली, तर २०११ मध्ये दोघेही मुलगा कियानचे पालक झाले. लग्नाच्या काही वर्षांनंतर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि २०१४ मध्ये करीश्माने घटस्फोटासाठी अर्ज केला. २०१६ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २०२३ मध्ये हे जोडपे दोन वेळा एकत्र दिसले. एका जेवणाच्या वेळी ते होते आणि दुसरे मुलगी समाराच्या १८ व्या वाढदिवशी. करीश्मा आणि संजयचा घटस्फोट झाला असला तरी त्यांची मुले संजयला वारंवार भेटत असत.
पापाराझींनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, करीश्मा कपूर आणि संजय कपूर मुंबईतील एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसत होते. करीश्मा कपूरने फ्लोरल प्रिंटेड ड्रेस घातला होता, तर संजय कपूर पांढऱ्या शर्ट आणि काळ्या जीन्समध्ये पापाराझींसाठी पोज देताना दिसला. दोघेही एकमेकांकडे न पाहता वेगवेगळ्या कारमध्ये बसलेले दिसले.
दुसरी पोस्ट स्वतः संजय कपूरने शेअर केली होती, ज्यामध्ये त्याने मुलगी समायराला तिच्या १८ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याने त्याच्या मुलीबरोबरचे काही फोटो शेअर केले होते, त्यापैकी एका फोटोमध्ये ते करिश्मा कपूर, मुलगी समायरा, मुलगा कियान आणि त्याची पत्नी प्रिया सचदेव आणि मुलगा अझारियस यांच्याबरोबर पोज देताना दिसत आहेत. त्याने पोस्टला कॅप्शन दिले, “एक वडील आपल्या मुलीचा हात काही काळासाठी धरतात, पण ती त्याचे हृदय कायमचे धरून ठेवते. माझ्या पहिल्या प्रेमाला, समायराला १८ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. प्रौढत्वात आपले स्वागत आहे. जबाबदार राहा आणि तुमचे आयुष्य पूर्ण जगा. तू आतून सुंदर आहेस. आणि आम्हा सर्वांना तुझा खूप अभिमान आहे.”
A father holds his daughter’s hand for a short while, but he holds her heart forever. Happy 18th birthday to my first love, Samaira. Welcome to adulthood. Remember to be responsible and live your life to the fullest. You are beautiful inside out. And we are all so proud of you ♥️ pic.twitter.com/zehZE9dVoq
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— Sunjay Kapur (@sunjaykapur) March 11, 2023
गुरुवारी त्यांच्या निधनाच्या काही तास आधी संजय कपूर यांनी अहमदाबाद विमान अपघाताबद्दल इन्स्टाग्रामवर पोस्ट करून दुःख व्यक्त केले होते. संजय यांनी इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले होते की अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघाताची बातमी खूप दुःखद आहे. त्यांनी पीडित कुटुंबांप्रती संवेदनाही व्यक्त केल्या.