सनी लिओनीचा अडल्ड इंडस्ट्री ते बॉलिवूड हा प्रवास खरंच थक्क करणारा होता. पण इथंपर्यंतचा तिचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. दरम्यानच्या काळात तिच्यावर बरीच टीका झाली. तिला सोशल मीडियावर वेगवेगळ्या कारणांनी ट्रोलही करण्यात आलं. पण अखेर सनीनं बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलंच. आज सनी ४१ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्तानं जाणून घेऊयात तिच्या अशा एका ट्वीटविषयी जे सोशल मीडियावर प्रचंड वादग्रस्त ठरलं होतं. एवढंच नाही तर सनी या ट्वीटमुळे अडचणीत आली होती.

सनी लिओनीनं असं एक ट्वीट केलं होतं ज्यामुळे तिला लोकांच्या टीकेचा सामना करावा लागला होता. तिने बलात्काराबाबत एक वादग्रस्त ट्वीट केलं होतं असं बोललं जातं. जे कमाल आर खाननं रिट्वीट केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. त्याने लिहिलं होतं, “सनी लिओनी म्हणते की, बलात्कार हा अपराध नाही तर फक्त एक सरप्राइज सेक्स आहे.” त्यानंतर यावरून सोशल मीडियावरून सनीवर टीकेची झोड उठली होती.

A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
PM Modi, Manipur, PM Narendra Modi,
मोदीजी म्हणतात, मणिपूरप्रश्नी वेळीच हस्तक्षेप केला… खरंच?
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: आम्हीही तेव्हाच ‘व्हेटो’विरोधात होतो..
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

आणखी वाचा- कतरिना कैफ खरंच आहे का गरोदर? पती विकी कौशलनं अखेर चर्चांवर सोडलं मौन

सनी लिओनीनं मात्र यावर स्पष्टीकरण देताना आपण हे ट्वीट केल्याचं नाकारलं होतं. एवढंच नाही तर तिने दावा केला होता की, तिचं अकाउंट जवळपास ५-१० मिनिटांसाठी हॅक झालं होतं. सनी लिओनीनं मुंबई पोलीसांच्या सायबर क्राइम इन्वेस्टिगेशन सेलकडे कमाल आर खानच्या विरोधात तक्रार देखील केली होती. यावर उत्तर म्हणून कमाल आर खाननं देखील सनी आणि तिच्या पतीच्या विरोधात तक्रार केली होती.

या संपूर्ण प्रकरणावर सनी म्हणाली होती की, “हा सर्व मूर्खपणा आहे. मी कमाल आर खानला उत्तर देऊन त्याला प्रोत्साहन देऊ इच्छित नाही. पण त्याने जे केलं तो फारच संवेदनशील मुद्दा आहे. दिल्लीमध्ये घडलेल्या घटनेनंतर देशात बलात्काराचा मुद्दा खूपच संवेदनशील झाला आहे. लोक माझ्याबद्दल काय बोलतात याने मला फरक पडत नाही. मला तुम्ही काही बोला. पण या प्रकरणाशी माझा काहीच संबंध नाही आणि त्याच्याशी मला जोडू नका.”

आणखी वाचा- Loksatta Exclusive: “मराठी सिनेसृष्टीत दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीप्रमाणे एकी नाही” प्रसाद ओक स्पष्टच बोलला

सनी लिओनीच्या ट्विटर अकाउंटवरून व्हायरल झालेल्या ‘बलात्कार हा गुन्हा नाही तर एक सरप्राइज सेक्स आहे’ या कथित ट्वीटनंतर तिच्यावर टीका झाली होती. पण सनीनं यावर कोणतंही स्टेटमेंट किंवा स्पष्टीकरण देण्यास नकार दिला होता आणि आपल्या दुसऱ्या एका ट्वीटमध्ये लिहिलं होतं की, ‘ज्याने कोणी अशाप्रकारचं स्टेटमेंट केलं आहे की बलात्कार हे सरप्राइज सेक्स आहे ती व्यक्ती मूर्ख आहे. मी असं कधीच म्हटलेलं नाही. कृपया समजूतदार व्हा.’