बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री सनी लिओनी तिच्या पोस्टमुळे सतत चर्चेत असते. सनी लिओनीने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये सनी लिओनी पती डेनियल वीबरसोबत ‘लंदन ठुमकदा’ या गाण्यावर जबरदस्त डान्स केलाय. व्हिडीओतील सनी लिओनीच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स पाहून चाहते फिदा झाले आहेत.
या व्हिडीओमध्ये सनी लिओनीचा पती डेनियल वीबर अतिशय फ्लेक्सिबल दिसून येतोय. सनी लिओनीसोबत त्याच्याही स्टेप्स प्रेक्षकांचं मन जिंकून घेत आहेत. सनी लिओनीने हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर काही वेळातच याला लाखो लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना सनी लिओनीने एक कॅप्शन देखील लिहिली आहे. यात तिने लिहिलंय, “प्रत्येक जण चांगल्या गाण्यावर डान्स करू शकतो. याचा अर्थ असा नाही की चांगलं गाणं सगळ्यांनाच उत्तम डान्सर बनवतं…”
View this post on Instagram
या व्हिडीओमध्ये सनी लिओनीच्या डान्सचे स्टेप पाहून तिचा पती डेनियल वीबर सुद्धा तशाच स्टेप्स करण्याचा प्रयत्न करताना दिसून येतोय. या व्हिडीओमध्ये दोघांची मस्ती सुरू असतानाच बॅकग्राऊंडला हसण्याचा देखील आवाज येतोय. हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर अवघ्या पाच तासांमध्येच ५ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
सनी लिओनीची जबरदस्त फॅन फॉलोइंग
सनी लिओनी तिच्या सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोइंग देखील मोठ्या प्रमाणात आहे. इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे ४५.९ मिलियन फॉलोअर्स आहेत. सनी लिओनी सुद्धा तिच्या चाहत्यांना कधी नाराज होऊ देत नाही. चाहत्यांशी संपर्कात राहण्यासाठी नेहमीच ती तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिचे फोटोज आणि व्हिडीओज शेअर करत असते. काही दिवसांपूर्वीच तिने एक व्हिडीओ शेअर केला होता. यात ती शूट दरम्यान लाइन विसरलेली दिसून येतेय. हा व्हिडीओ जवळजवळ ५६ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला. पण, ती कोणत्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, हे मात्र तिने सांगितलं नाही.