‘बॉलिवूडची बेबी डॉल अशी ओळख निर्माण केलेली अभिनेत्री सनी लिओनीची ‘बी टाऊन’मधील सर्वात मादक अभिनेत्रींपैकी एक अशी ओळख आहे. तिचा भूतकाळ जरी वेगळा असला तरी वर्तमानात मात्र ती आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत नक्कीच बसते. आज कित्येक बॉलिवूड निर्मात्यांना तिचे एखादे तरी आयटम साँग आपल्या गाण्यात हवे असे वाटत असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार नुकतेच तिला ‘रईस’ सिनेमात बॉलिवूडच्या किंगसोबत म्हणजे शाहरूख खानसोबतही काम करायची संधी मिळाली. आता एवढे सगळे कौतुक करत असताना आणि नाव कमावत असतानाही सनीला मात्र आजही एक खंत सतावत आहे. ‘काही वर्षांपूर्वी जेव्हा मी या सिनेसृष्टीत आले तेव्हा मला लगेचच कुणी भूमिका दिल्या नाहीत. उलट, ‘तुझे इथे काही होऊ शकणार नाही. तुला लहान मोठ्या भूमिका करुनच परतावे लागेल. अशी वाक्ये मला सतत ऐकायला मिळाली,’ असे ती म्हणाली. पण, मला असे वाटते की, रईस सिनेमातील माझ्या गाण्यामुळे सर्वांनाच आता माझे महत्त्व कळाले असेल.

शाहरूख खानसोबत काम करायला मिळावं ही सिनेसृष्टीत पाऊल ठेवणाऱ्या प्रत्येकाचीच इच्छा असते. मात्र, प्रत्येकाचेच हे स्वप्न पूर्ण होते असे नाही. इतरांसारखेच शाहरुखसोबत एकदा तरी काम करण्याचे सनीचेही स्वप्न होते. ते ‘रईस’मधील ‘लैला मैं लैला’ या गाण्यामुळे साकार झाले असेच म्हणावे लागेल. तिच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाबद्दल सांगताना ती म्हणते,‘माझा प्रवास सोपा कधीच नव्हता. सिनेमात काम मिळवण्यासाठी मला खूप लोकांची बोलणी ऐकून घ्यावी लागली होती. खूप स्ट्रगलनंतर मला सिनेमे मिळू लागले. मला सोशल मीडियानेच मोठे केले. त्यामुळे मी स्वत:ला सोशल मीडियाचे एक प्रोडक्टच मानते.’

सनी लिओनीने ‘जिस्म २’,‘कुछ कुछ लोचा हैं’ यांसारख्या सिनेमात काम केले. आव्हान स्वीकारणाऱ्या सनीने प्रत्येक भूमिकेसाठी अथक मेहनत घेतली. त्याचे फलित म्हणूनच आज तिला बॉलिवूडमध्ये एक अभिनेत्री अशी स्वतंत्र ओळख मिळाली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunny leone i am a product of social media
First published on: 21-01-2017 at 19:08 IST