प्रसिद्ध अभिनेत्री व मॉडेल गिगी हदीद ही कायमच तिच्या फॅशनसाठी ओळखली जाते. मात्र, आता ती एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. प्रवासादरम्यान गिगी हदीदकडून गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी तिला अटक करण्यात आली आहे. त्यासाठी तिला दंडही ठोठावण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गिगी हदीद तिची मैत्रीण लिआह निकोल मॅककार्थी हिच्याबरोबर एका खासगी विमानाने प्रवास करीत होती. यावेळी विमानतळावर गिगी आणि लिआह यांच्या बॅगांची झडती घेण्यात आली. त्यावेळी विमानतळावरील अधिकाऱ्यांना गांजा आणि गांजाच्या वापराशी संबंधित इतर साहित्य सापडले. हे साहित्य त्या दोघी कॅमेन आयलँडमध्ये घेऊन जात आहेत, अशी शंका पोलिसांना आली. त्यानंतर त्या दोघींनाही अटक करण्यात आली.
आणखी वाचा : “माझे वडील…”, रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर होणाऱ्या ट्रोलिंगवर गश्मीर महाजनीची पोस्ट, म्हणाला…

गिगी हदीदच्या सामानात गांजा आढळल्यानंतर त्या दोघींना अटक करण्यात आली. त्यानंतर १२ जुलै २०२३ रोजी गिगी व लिआह निकोल मॅककार्थी या दोघांना समरी कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी त्यांना त्यांच्यावर केलेल्या आरोपांसाठी दोषी ठरवण्यात आले. यावेळी त्यांना प्रत्येकी एक हजार डॉलर दंड ठोठावण्यात आला. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला.

आणखी वाचा : प्रत्येकीला वेगळा रंग, ब्लाऊजवर विशिष्ट संदेश अन्…; ‘बाईपण भारी देवा’मधील ‘मंगळागौर’ गाण्यासाठी वापरलेल्या साड्यांची ‘ही’ आहे खासियत

दरम्यान, गिगी ही सध्या हॉलीवूड अभिनेता लिओनार्दो डी कॅप्रियोलाशी डेट करत आहे. अनेकदा ते दोघेही बाहेर फिरतानाचे फोटो समोर आले आहेत. पण अद्याप त्या दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत दुजोरा दिलेला नाही. गिगी याआधी गायक झेन मलिकसोबत रिलेशनशिपमध्ये होती.