scorecardresearch

तब्बल ३८ भाषा अन् 3D व आयमॅक्समध्ये प्रदर्शित होणार ‘या’ सुपरस्टारचा चित्रपट; प्रदर्शनाआधीच कमावले ‘इतके’ कोटी

या दाक्षिणात्य चित्रपटाने प्रदर्शनाआधीच ओटीटी हक्कांच्या माध्यमातून तब्बल ८० कोटी कमावले आहेत

suriya-kangua
फोटो : सोशल मीडिया

‘जय भीम’या चित्रपटामुळे अधिक लोकप्रिय झालेला दाक्षिणात्य अभिनेता सूर्या हा त्याच्या आगामी चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. दिग्दर्शक सिवा यांच्या ‘कंगुआ’ या आगामी बिग बजेट चित्रपटात सूर्या एका वेगळ्याच अवतरात दिसणार आहे. हा चित्रपट इतिहास आणि काल्पनिक कथा यांचं एक योग्य मिश्रण असलेला एक मॅग्नम ओपस लेव्हलचा चित्रपट असणार आहे हे याच्या फर्स्ट लुकवरुन समोर आलंच होतं. आता या चित्रपटाबद्दल बऱ्याच गोष्टी समोर येत आहेत.

या दाक्षिणात्य चित्रपटाने प्रदर्शनाआधीच ओटीटी हक्कांच्या माध्यमातून तब्बल ८० कोटी कमावले आहेत. सिरुथाई शिवा या दिग्दर्शकाचा आगामी चित्रपट ‘कंगुवा’चे डिजिटल हक्क अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओने चक्क ८० कोटींना विकत घेतले आहेत. इतकंच नाही तर हे हक्क फक्त दाक्षिणात्य भाषेतील चित्रपटासाठी असल्याचं निर्मात्याने स्पष्ट केलं आहे.

wahida rehman
गोष्ट पडद्यामागची: हॉलीवूडमध्ये झळकलेल्या ‘गाईड’ चित्रपटाची गोष्ट, देव आनंद यांच्या सिनेमात वहिदा रेहमान यांची वर्णी कशी लागली?
junior ntr saif ali khan and janhvi kapoor starrer telugu film devara
दाक्षिणात्य सुपरस्टारसह जान्हवी कपूर करणार रोमान्स, तर सैफ अली खान साकारणार ‘ही’ भूमिका, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
Animal Teaser
Animal Teaser : रणबीर कपूरचे हिंस्त्र रुप, जबरदस्त अ‍ॅक्शन अन्…; बहुचर्चित ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
oppenheimer-ott-release
नेटफ्लिक्स की अ‍ॅमेझॉन प्राइम; कधी व कशावर पाहता येणार ख्रिस्तोफर नोलनचा ‘ओपनहायमर’?

आणखी वाचा : नेटफ्लिक्सच्या ‘त्या’ निर्णयामुळे अनुराग कश्यपला आलेला दोनदा हार्ट अटॅक; दिग्दर्शकाचा मुलाखतीदरम्यान खुलासा

याबरोबरच हा चित्रपट मनोरंजनविश्वात एक वेगळाच इतिहास रचणार असल्याचंही स्पष्ट झालं आहे. हा चित्रपट दोन चार नव्हे तर तब्बल ३८ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. इतकंच नव्हे तर हा चित्रपट ‘३डी’ आणि ‘आयमॅक्स’ या दोन्ही व्हर्जनमध्ये प्रदर्शित होणार असल्याचं निर्मात्यांनी स्पष्ट केलं आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून जगातील भाषेच्या सीमेपलीकडे जाऊन काहीतरी नवीन करायचा उद्देश निर्मात्यांचा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

अजून फक्त या चित्रपटाची घोषणा झालेली आहे. याच्या टीझर ट्रेलरची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. ‘कंगुवा’ हा चित्रपट तब्बल ३८ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सूर्याबरोबरच बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीदेखील दिसणार आहे. या चित्रपटातून दिशा तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. २०२४ च्या सुरुवातीलाच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Suriya starrer kangua to be released in 38 languages with 3d and imax versions avn

First published on: 21-11-2023 at 20:27 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×