‘राबता’ या चित्रपटातून अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि क्रिती सनॉन ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला, मात्र ही जोडी चांगलीच चर्चेत आली. या दोघांमध्ये प्रेम बहरत असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड वर्तुळात रंगताना दिसत आहेत. दोघांनी उघडपणे त्यांच्यातील नात्याचा स्वीकार केला नसला तरी अनेकदा सुशांत- क्रिती एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसले. ही जोडी आता पुन्हा एकदा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे फराह खानने आयोजित केलेली पार्टी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गायक एड शीरनसाठी फराह खानने ग्रँड पार्टीचं आयोजन केलं होतं आणि या पार्टीला बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. पार्टीत सुशांत आणि क्रितीलाही एकत्र पाहिलं गेलं. इतकंच नाही तर पार्टी झाल्यानंतर रविवारी सकाळी हे दोघे एकाच कारमधून निघाले. विशेष म्हणजे यावेळी दोघांनीही प्रसारमाध्यमांपासून लपण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे या पार्टीमध्ये आणि पार्टीनंतरही सुशांत आणि क्रितीनेच सर्वांचं लक्ष अधिक वेधलं असं म्हणायला हरकत नाही.

काही दिवसांपूर्वी क्रिती सुशांतच्या घराजवळ दिसली होती. प्रसारमाध्यमांपासून लांब राहण्यासाठी तिने सुशांतच्या घरापासून काही अंतरावर तिची कार पार्क केली होती. दोघांच्या या गुपचूप भेटीबाबत बॉलिवूड वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushant singh rajput and kriti sanon make their relationship official
First published on: 21-11-2017 at 09:57 IST