scorecardresearch

सुशांतनं साराला केलं अनफॉलो

ते दोघंही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा कालपरवापर्यंत सुरू होत्या.

सारा अली खाननं ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सुशांत सिंग राजपुत या चित्रपटात प्रमुख भूमिकेत होता. या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली. या चित्रपटाला प्रेक्षकांकडूनही खूप चांगला प्रतिसाद मिळाला. चित्रपटाच्या यशानंतर सारा आणि सुशांत या दोघांमध्ये काहीतरी शिजत असल्याच्या चर्चा बी टाऊनमध्ये सुरू झाल्या.

सारा आणि सुशांत हे दोघंही अनेकदा सार्वजनिक ठिकाणी दिसायचे. ते दोघंही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा कालपरवापर्यंत सुरू होत्या. मात्र आता सुशांतनं साराला इन्स्टाग्रामवर चक्क अनफॉलो केलं आहे. सारा सध्या इम्जिआज अलीच्या चित्रपटात व्यग्र आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन प्रमुख भूमिकेत आहे. कार्तिकसोबत साराची वाढत जाणारी जवळीक यामुळे कदाचित सुशांतनं तिला अनफॉलो केल्याचं म्हटलं जात आहे.

काही महिन्यांपूर्वी कॉफी विथ करण कार्यक्रमात सारानं कार्तिकसोबत डेटवर जाण्याची इच्छा बोलून दाखवली होती. आठवड्याभरापूर्वी सुशांतनं इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आपल्या पोस्टही डीलीट केल्या होत्या. इन्स्टाग्रामपासून आपण फारकत घेत असल्याचं त्यानं जाहीर केलं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sushant singh rajput unfollows kedarnath co star sara ali khan

ताज्या बातम्या