अभिनेत्री सुष्मिता सेनची मोठी लेक रेनी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. रेनीला सोशल मीडियावर एका नेटकऱ्याने बॉयफ्रेंडविषयी प्रश्न विचारला होता. दरम्यान, रेनीने त्यावर उत्तर दिलं आहे. सुष्मिता सेनची लेक सिंगल आहे की तिचा बॉयफ्रेंड आहे याचं उत्तर चाहत्यांना मिळालं आहे.
रेनीने इन्स्टाग्रामवरील ‘AskMeAnything’ द्वारे चाहत्यांशी संवाद साधला. अनेक चाहत्यांनी तिला तिच्या लव्ह लाइफ पासून तिला अभिनेत्री होण्याची इच्छा आहे का असे अनेक प्रश्न विचारले. “बॉयफ्रेंड आहे का?” असा प्रश्न एका नेटकऱ्यांने रेनीला विचारला. सिंगल आहे असं उत्तर देत रेनी म्हणाली, “कामावर लक्ष आहे माझं.” दुसऱ्या नेटकऱ्याने एक्स बॉयफ्रेंडविषयी प्रश्न विचारला तर रेनी म्हणाली, “या गोष्टीवर चर्चा करण्यात काही अर्थ नाही.” तिसऱ्या नेटकऱ्याने भविष्यातील बॉयफ्रेंडवर प्रश्न विचारला तर रेनी म्हणाली, “मला टाइम ट्रॅव्हल करण्याची संधी मिळाली असती तर मी याचं उत्तर देऊ शकली असती.”
View this post on Instagram
आणखी वाचा : त्या दिवसानंतर अनिल कपूरसोबत पुन्हा काम न करण्याचा निर्णय माधूरीने घेतला होता
रेनी बॉलिवूडमध्ये करिअर करण्याची तयारी करत आहे. ‘सुतबाजी’ या शॉर्ट फिल्ममधून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. या वर्षाच्या सुरूवातीला एका मुलाखतीत रेनीने खुलासा केला की सुष्मिता सेनची मुलगी असणे ही सर्वात मोठी गोष्ट आहे.