Sushmita Sen Daughter Renee Sen Photos Viral : बॉलीवूड अभिनेत्री सुश्मिता सेन तिच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असते. तिचे आयुष्य एखाद्या चित्रपट कथेपेक्षा कमी नाही. सुश्मिता आज अविवाहित असली तरी तिचे नाव अनेक लोकांशी जोडले गेले आहे. इतकेच नाही, तर सुश्मिता लग्नाशिवाय दोन सुंदर मुलींची आई आहे. अभिनेत्रीने रेनी व अलिशा सेन या दोन सुंदर मुलींना दत्तक घेतले होते.

आज सुश्मिताची मुलगी रेनी ‘खूप मोठी’ झाली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर रेनीचे ट्रान्स्फॉर्मेशन फोटो चर्चेत आहेत. रेनीचे फोटो पाहून लोक तिला ८० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीची हुबेहूब कॉपी म्हणत आहेत. चला जाणून घेऊया ती अभिनेत्री कोण आहे?

सुश्मिता सेनची मुलगी रेनीचा ४ सप्टेंबर रोजी २५ वा वाढदिवस होता. अशा परिस्थितीत अभिनेत्रीने तिच्या मोठ्या मुलीला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा इन्स्टाग्रामवर शेअर केल्या होत्या. या फोटोंमध्ये रेनीचे ट्रान्स्फॉर्मेशन पाहून सर्व जण तिच्याकडेच पाहत राहिले. रेनीचे लेटेस्ट फोटो पाहून चाहते तिचे कौतुक करीत आहेत.

फोटोंमध्ये रेनी दिसतेय स्मिता पाटील यांच्यासारखी

फोटोंमध्ये रेनी सेनच्या लूकबद्दल बोलायचे झाले, तर पहिल्या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा लाँग ड्रेस घातला आहे. या फोटोमध्ये रेनीची स्टँडिंग स्टाईल पूर्णपणे तिचा आत्मविश्वास दाखवत आहे. तर, दुसऱ्या फोटोमध्ये रेनी शिमरी ड्रेस घालून खुर्चीवर बसली आहे. हे दोन्ही फोटो पाहून लोक तिचे खूप कौतुक करीत आहेत.

रेनी सेनचे हे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. युजर्स त्यावर कमेंट करून, तिचे कौतुक करीत आहेत. सोशल मीडियावरील बहुतेक युजर्स रेनीला ८० च्या दशकातील सुंदर अभिनेत्री स्मिता पाटील यांची हुबेहूब कॉपी म्हणत आहेत. एका युजरने कमेंट केली, “हे मला स्मिता पाटील यांच्या लूकची आठवण करून देते.” दुसऱ्या युजरने लिहिले, “एक सेकंदासाठी मला वाटले की, त्या स्मिता पाटील आहेत.” एकाने लिहिले, “ती सुश्मिता सेन आणि स्मिता पाटील यांच्या कॉम्बिनेशनसारखी दिसते. सर्वत्र सुंदर.” या फोटोंवर अशा अनेकविध कमेंट्स येत आहेत.

सुष्मिता अविवाहित असली तरी ती दोन मुलींची आई आहे. मॉडेलिंग करत असताना तिने दोन मुलींना दत्तक घेतलं होतं. या दोघींचं संगोपन सुष्मितानेच केलंय. विशेष म्हणजे सुष्मिताचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन याचंही तिच्या मुलींशी खूप चांगलं नातं आहे. तो अनेकदा त्यांच्याबरोबर वेळ घालवताना दिसतो.