बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन तिच्या ग्लॅमरस अंदाजासोबत फिटनेससाठी ओळखली जाते. सुष्मिता तिच्या रिलेशनशिपमुळे देखील अनेकदा चर्चेत आली आहे. मात्र बोल्ड आणि बिनधास्तपणे सुष्मिताने कायम तिच्या नात्यांचा जगासमोर स्विकार केलाय. बॉलिवूडपासून सुष्मिता काहीशी दुरावली असली तरी ती वेगवेगळ्या कारणांमुळे कायमच चर्चेत असते. नुकतीच सुष्मिता चर्चेत आली आहे ते म्हणजे तिच्या व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे.

सुष्मिताचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केल्याचं दिसतंय. सुष्मिता एका स्टोरमधून बाहेर येते याचवेळी तिचा पाय दारातील मॅटमध्ये अडकून ती पडता पडता वाचते. यावर सुष्मिता ” अरे बापरे आता मी पडले असते” असं म्हणताना दिसतेय. त्यानंतर ती एका बाजूला होवून फोटोग्राफरला पोज देत असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र यात सुष्मिताचा कॉन्फिडन्स दिसून येतोय. पडत असतानाही ती स्वत:ला सावरते आणि पोज देऊ लागते.

“आमिर सारखं तुझं लग्नही टिकणार नाही”, नेटकऱ्याच्या कमेंटवर रिचा चड्ढा भडकली


सुष्मिता वयाने १५ वर्ष लहान असलेल्या रोहमन शॉलला डेट करतेय. अनेकदा सुष्मिता रोहमन आणि तिच्या दोन्ही मुलींसोबत वेळ घालवताना दिसते. तसचं ती मुलींसोबतचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. त्याचसोबत सुष्मिता तिच्या वर्क आऊटच्या व्हिडीओंमुळे देखील अनेकदा चर्चेत असते. सोशल मीडियावर तिला कायमच चाहत्यांची मोठी पसंती मिळते.