बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन सोशल मीडियावर नेहमची काही ना काही कारणानं चर्चेत असते. काही वर्षं चित्रपटांतून ब्रेक घेतल्यानंतर सुष्मितानं ‘आर्या’ या वेब सीरिजमधून कमबॅक केलं. तिची ही वेब सीरिज बरीच गाजली. नुकतीच सुष्मिता सेननं ट्विंकल खन्नाच्या टॉकशोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये तिनं करिअर आणि खासगी आयुष्य यावर भाष्य केलं. तसेच या शोमध्ये तिने महेश भट्ट यांच्यावर भडकल्याचा एक किस्सा देखील शेअर केला.

सुष्मिता सेननं ट्विंकल खन्नाचा युट्यूब शो ‘ट्विक’मध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये सुष्मितानं सांगितलं की जेव्हा ती मिस युनिव्हर्सचा मुकूट जिंकून भारतात परतली होती तेव्हा तिला दिग्दर्शक महेश भट्ट यांचा कॉल आला होता. सुष्मिता सेन म्हणाली, “महेश भट्ट यांनी मला कॉल करून विचारलं होतं की माझ्या आगामी चित्रपटाची अभिनेत्री होशील का? त्यावर मी त्यांना सांगितलं मला अभिनय येत नाही ना मी अभिनयाचे धडे घेतले आहेत. तर ते म्हणाले मी तुला अभिनेत्री म्हटलेलंच नाही.”

आणखी वाचा- “सेक्ससाठी काय करतोस?” जेव्हा करण जोहरनं कपिल शर्माला विचारला होता खासगी प्रश्न

सुष्मिता पुढे म्हणाली, “महेश भट्ट यांनी मला विश्वास दिला की मी हे करू शकते, तेव्हा मी चित्रपटाच्या सेटवर पोहोचले. त्यादिवशी माझा एक सीन होता ज्यात संताप दाखवायचा होता. पण हा सीन देणं मला काही केल्या जमत नव्हतं. शेवटी महेश भट्ट मला म्हणाले अरे कुठून आली आहेस तू , तुला काहीच येत नाही. त्यांच्या बोलण्याचा मला खूप राग आला. मी रागात स्वतःचे इअरिंग्स फेकून दिले आणि तिथून निघून जात होते. एवढ्यात महेश भट्ट यांनी माझा हात पकडला आणि मला म्हणाले, हाच राग मला त्या सीनमध्ये हवा आहे. मला राग देण्यासाठी त्यांनी ही युक्ती केली होती.”

आणखी वाचा- फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली पोस्ट, म्हणाल्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान सुष्मिता सेननं महेश भट्ट यांच्या ‘दस्तक’ चित्रपटातून आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती. यानंतर तिने बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं होतं. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर तिने बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. सध्या ती वेब सीरिज ‘आर्या’च्या आगामी सीझनची तयारी करत आहे. याआधी या या वेब सीरिजचे दोन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.