बॉलिवुडमधली अभिनेत्री व मिस युनिव्हर्सची मानकरी सुष्‍मिता सेनने रिकी मार्टिनबरोबर काढलेले एक जुने छायाचित्र इन्स्टाग्रामवर अपलोड केले आहे. या छायाचित्रामुळे गेला बराच काळ माध्यम चर्चेतुन दूर असलेली सुष्‍मिता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. रिकी मार्टिन हा ग्रॅमी पुरस्कार विजेता गायक आहे. ९०च्या दशकात मॅक्सिकोमधील एका खाजगी कार्यक्रमादरम्यान सुष्‍मिता व रिकीची भेट झाली होती. पुढे त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यावेळी सुष्‍मिता १८ वर्षांची होती तर रिकी २२ वर्षांचा होता.
विशेष म्हणजे हे छायाचित्र सुष्मिताच्या संग्रहात नव्हतं. तर सुष्‍मिता सेनच्या एका चाहत्याने हे छायाचित्र समाजमाध्यमांवर अपलोड केलं होतं. या त्याच्या कृत्याला खिलाडूवृत्तीनं घेत सुष्‍मितानं केवळ ते छायाचित्र संग्रहीतच घेतलं नाही तर, तिने त्या छायाचित्राला इन्स्टाग्रामवर रिपोस्ट केलं.
सुष्‍मिता सेन सध्या अभिनयापासून दूर आहे. त्यामुळे झगमगत्या अशा बॉलीवूडचा प्रकाशझोतही तिच्यावर नाहीये. अर्थात, ती जरी प्रकाशझोतात नसली तरी ती चाहत्यांच्या मनात घर करून आहे हे या प्रसंगावरून दिसून आलं आहे. तर दुसऱ्या बाजुला रिकी मार्टिन मात्र ट्विटरवरील टिवटिव, नाइट पाटर्य़ामधून मद्यधुंद अवस्थेत केलेले धिंगाणे, कास्टिंग काउच आणि अभिनेत्रींनी केलेले लैंगिक शोषणाचे गंभीर आरोपांमुळे सातत्याने चर्चेत असतो. दोन महिन्यांपूर्वी त्याने स्वीडिश अभिनेता जेवान योसेफबरोबर लग्न केले. या समलैंगिक विवाहामुळेही तो चर्चेत आला. आणि त्याच्याबरोबरच्या फोटोमुळे सुश्मिताची चर्चाही काही काळ सोशल मीडियावर रंगलेली बघायला मिळाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushmita sen shares a throwback picture with ricky martin
First published on: 19-04-2018 at 18:04 IST