अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात स्वत:ची वेगळी छाप उमटवणारी अभिनेत्री म्हणजे सुष्मिता सेन. सध्या लॉकडाउन असल्यामुळे सुष्मिता तिच्या कुटुंबीयांसोबत घरी राहून त्यांच्यासोबत वेळ घालवत आहे. तसंच फावल्या वेळात ती सोशल मीडियावरही सक्रीय असल्याचं पाहायला मिळत आहे. या काळात सुष्मिता इन्स्टाग्रामवर चांगलीच अॅक्टीव्ह झाली असून तिच्या आयुष्यातील, दैनंदिन जीवनातील बऱ्याचशा घटना ती चाहत्यांसोबत शेअर करत आहे. यात तिने अलिकडेच तिची लहानशी लव्हस्टोरी सांगितली आहे.
सध्या पाहायला गेलं तर सुष्मिताचा कलाविश्वातील वावर तसा फार कमी झाला आहे. मात्र ती कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. अलिकडेच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने तिची लव्हस्टोरी उलगडली आहे.
सुष्मिताने तिच्या मुलींचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत दोघी बहिणी पियानो वाजवत आहेत. या व्हिडीओला सुष्मिताने, ‘माझी लव्हस्टोरी’, असं कॅप्शन दिलं आहे.
दरम्यान, सुष्मिता बऱ्याच वेळा तिच्या मुलींसोबतचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तसंच अनेक वेळा सुष्मिता तिच्या पर्सनल लाइफवरुनही चर्चेत येत असते.
