करोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जगातील लोक त्रस्त आहेत. या विषाणूने जगभरातील लोकांचे जीवन पार विस्कळीत करुन टाकले आहे. लॉकडाउनमुळे लोकांना घरातच कैद व्हावे लागले आहे. या सर्व घडामोडिंमध्ये करोना व्हायरस अभिनेता हृतिक रोशनसाठी मात्र आनंदाची बातमी घेऊन आला आहे. हृतिकची घटस्फोटित पत्नी सुझान खान आपल्या मुलांसाठी पुन्हा घरी परतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोना व्हायरसचे संक्रमण संपूर्ण देशात सुरु असताना सुझानला आपल्या मुलांची फार काळजी वाटत होती. रेहान आणि रिधान ही दोन मुलं स्वत:चा सांभाळ कसा करत असतील हे तिला कळत नव्हतं. त्यामुळे मुलांच्या काळजीनं ती व्याकूळ झाली होती. परिणामी सुझानने मुलांसाठी पुन्हा हृतिकच्या घरी परतण्याचा निर्णय घेतला.

हृतिक रोशनने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन सुझान घरी परतल्याची बातमी आपल्या चाहत्यांना दिली. या पोस्टमध्ये त्याने सुझानचे आभार मानले आहेत. तसेच तिच्या धैर्याचे कौतुक देखील केले आहे. हृतिकने पोस्ट केलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहे. काही जणांनी तर हृतिकला सुझान परतल्याच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sussanne khan moves in with ex husband hrithik roshan due to coronavirus lockdown mppg
First published on: 25-03-2020 at 17:51 IST