scorecardresearch

Premium

“गेल्या अनेक वर्षांपासून…” प्रवीण तरडेंचा वाढदिवस साजरा केल्यानंतर राजू शेट्टींची खास पोस्ट

यात राजू शेट्टी हे प्रवीण तरडेंना केक भरवताना दिसत आहेत.

raju shetti pravin tarde
याला त्यांनी फारच अनोखे कॅप्शन दिले आहे.

लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण विठ्ठल तरडे हे कायमच प्रसिद्धीझोतात असतात. ‘मुळशी पॅटर्न’, ‘धर्मवीर’, ‘सरसेनापती हंबीरराव’ अशा वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट त्यांनी प्रेक्षकांना दिले आहेत. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला सरसेनापती हंबीरराव या चित्रपट चांगलाच हिट ठरला. ते शेतीच्या कामात रमले होते. काही दिवसांपूर्वी त्यांचा व्यायाम करतानाचा व्हिडीओ शेअर केले होते. प्रवीण तरडे यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

राजू शेट्टी हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. नुकतंच त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी प्रवीण तरडेंबरोबर फोटो पोस्ट केला आहे. यात राजू शेट्टी हे प्रवीण तरडेंना केक भरवताना दिसत आहेत. याला त्यांनी फारच अनोखे कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : “मी राजू शेट्टींचा खूप मोठा चाहता, त्यांचा प्रवास खूप प्रेरणादायी”, प्रवीण तरडेंनी केले कौतुक

Nanded Case
“बाळाचे पाय गार पडले, डोळे कडक झाले, तरी डॉक्टर फिरकले नाहीत”; १२ वर्षांनी मूल झालेल्या माऊलीने फोडला टाहो
loudspeeker sound
आवाज वाढला, कुणी नाही ऐकला!; ध्वनिप्रदूषण आकडेवारीबाबत यंत्रणांचे कानावर हात
River silt lifting is necessary
यंदासारखी पाणीटंचाई टाळायची असेल, तर जलाशयांतील गाळ काढाच!
Health ministry reduces NEET PG 2023 cut-off to zero
‘वैद्यकीय पदव्युत्तर’चे पात्रतागुण शून्यावर; जागा रिक्त राहत असल्याने निर्णय

शेतक-यांच्या प्रश्नावर नेहमी आंदोलन, मोर्चे, पदयात्रा याकाळात गेल्या अनेक वर्षापासून माझ्यासोबत असणारे चित्रपटातील यशस्वी शेतक-यांचा मुलगा व अभिनेता प्रविण तरडे यांचा आज ४८ वा वाढदिवस त्यांच्या पुणे येथील निवासस्थानी साजरा केला, असे त्यांनी या फोटोला कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा : “असं तर होणारच…” अमृता खानविलकरशी दुरावा निर्माण झाल्याच्या प्रश्नावर सई ताम्हणकरचे स्पष्ट उत्तर

या फोटोतून प्रवीण तरडे यांनी त्याचा वाढदिवस राजू शेट्टींच्या निवासस्थानी साजरा केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही पोस्ट व्हायरल झाली आहे.

दरम्यान राजू शेट्टी आणि प्रवीण तरडे हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. यापूर्वीही त्यांनी अनेकदा फोटो शेअर करत प्रवीण तरडेंचे कौतुक केले होते. प्रवीण तरडेंच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटादरम्यान त्यांनी याबद्दल पोस्टही शेअर केली होती. यात प्रवीण तरडेंचे आणि त्यांच्या अभिनयाचे कौतुक केले होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Swabhimani paksha leader raju shetti share special post for pravin tarde birthday nrp

First published on: 11-11-2022 at 10:29 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×