बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत आहे. कधी कंगनाला दिलेल्या उत्तरांमुळे कधी करीनाला सीतेच्या भूमिकेसाठी दिलेल्या पाठिंब्यामुळे ती चर्चेत होती. गेल्या काही दिवसांपासून तापसी ‘हसीन दिलरूबा’ या तिच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आता तापसी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. तापसी आता अभिनयासोबतच निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. तापसीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याची माहिती दिली आहे.

तापसीने ट्विटवर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. “गेल्या वर्षी मला या भारतीय चित्रपटसृष्टीत यायला एक दशक पूर्ण झालं, तेव्हा मला माहित नव्हते की मी फक्त इथे राहणार नाही तर उंच भरारी घ्यायला मला शिकायला मिळेल. ज्या व्यक्तीने कधी लोकप्रिय होण्याचे स्वप्न पाहिले नाही, अशा वेळी ज्या लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्यांची मी कायम आभारी असेल. आता परतफेड करण्याची वेळ आली आहे, कारण मोठ्या सामर्थ्याने मोठ्या जबाबदारी येतात. त्यामुळे मला शुभेच्छा द्या आणि मी वचन देते की आऊटसाइडर्समधून सर्वोत्कृष्ट देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. कारण सगळ्यात चांगला व्ह्यू हा बाहेरूनच असतो. आता जीवनाचा एक नवीन अध्याय लिहिणार आहे, आता निर्माता म्हणून आऊटसाइडर्स फिल्ममधून काम करणार,” अशा आशयाची पोस्ट तापसीने शेअर केली आहे.

आणखी वाचा : ‘तुला लाज वाटायला हवी, तू मुस्लीम आहेस’, कामाख्या देवीचे दर्शन घेतल्याने सारा झाली ट्रोल

तापसीने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये आऊटसाइडर्स कसं सुरु झालं हे तिने सांगतिलं आहे. “आणि हे सर्व त्याची प्रेरणा आणि विश्वासामुळे सुरू झाले. हा आता हे सगळं सांभाळण्यासाठी तयार आहे. आता हा आऊटसाइडर्सचा शो चालवणार आहे. प्रांजल आणि मी मैत्री आणि व्यवसाय या दोघी गोष्टी सांभाळणार आहोत, या सोबतच आम्ही खात्री देतो की आमच्या प्रोजेक्टसवर असलेला तुमचा प्रत्येक रुपया हा व्यर्थ जाणार नाही,” असे तापसी म्हणाली. या पोस्टसोबत तापसीने एक फोटो देखील शेअर केला आहे.

आणखी वाचा : घटस्फोटानंतर आमिर आणि किरण रावने लडाखमध्ये केला एकत्र डान्स, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, तापसी लवकरच ‘लूप लपेटा’, ‘रश्मी रॉकेट’, ‘दूबारा’, ‘शाबास मिथू’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. ‘शाबास मिथू’ या चित्रपटात तापसी भारतीय महिला क्रिकेट टीमची कर्णधार मिताली राज हिच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राहूल ढोलकिया करणार आहे.