तापसी पन्नू ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. गेल्या काही दिवसांपासून तापसी ‘हसीन दिलरुबा’ या तिच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तापसीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या आई आणि बॉयफ्रेंडविषयी काही गोष्टी सांगितल्या आहेत. तापसीची आई एक वाईट चिअरलीडर आहे, तर बॉयफ्रेंड मॅथिअस बोईला तापसीच्या ऑनस्क्रिन भावना कळतं नाही.

‘हिंदुस्तान टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत तापसीने हा खुलासा केला आहे. “माझी आई एक निराशाजनक चिअरलीडर आहे, तिला माझे सर्व चित्रपट आवडतात. माझा बॉयफ्रेंड मॅथिअसला हिंदी चित्रपट समजत नाही. त्याने माझे सगळे चित्रपट पाहिले आहेत परंतु ते पश्चिमी चित्रपटांपासून खूप वेगळे आहेत त्यामुळे त्याला समजत नाही. त्याला भावना समजत नाही. त्याने माझे सगळे चित्रपट पाहिले आहेत परंतु भावनिक, नाट्यमय गोष्टींशी तो समजू शकतं नाही, असे तापसी म्हणाली.”

आणखी वाचा : अखेर आमिर आणि किरण राव यांच्या घटस्फोटाचं खरं कारण आलं समोर..

 

View this post on Instagram

 

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

पुढे तापसी ‘शाबास मिथू’ या चित्रपटाविषयी बोलताना म्हणाली, “मी सगळ्यात जास्त तणाात आहे हे मी सांगू शकते. ‘शाबास मिथू’बद्दल मी खूप तणावात आहे कारण त्या चित्रपटात मी पाण्याबाहेर असलेल्या माशासारखी आहे. हा चित्रपट करण्यापूर्वी मी कधीच क्रिकेट खेळले नव्हते. मला भीती वाटते की मी योग्य रित्या क्रिकेट खेळू शकेल की नाही. क्रिकेट आपल्या देशाचा एक धर्म आहे. ”

आणखी वाचा : ‘…म्हणून मला बाळाला स्तनपान करतानाचा फोटो शेअर करायची गरज वाटत नाही’ : करीना कपूर

तापसीचे लाखो चाहते आहेत. अभिनयानंतर आता तापसीने स्वत:चे प्रोडक्शन हाऊस देखील सुरु केले आहे. काही दिवसांपूर्वी तापसीने ‘आउटसाइडर्स’ या तिच्या प्रोडक्शन हाऊसची घोषणा केली. ‘पिंक’, ‘मुल्क’, ‘मनमर्जियां’ आणि ‘थप्पड’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये तापसीने मुख्य भूमिका साकारली आहे.