‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोमध्ये एकेकाळी भिडे मास्तरांच्या सोनूची भूमिका साकारणारी अभिनेत्री निधी भानुशाली सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. या शोनंतर आता इंटरनेट सेंसेशन ठरत असलेल्या निधीचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. निधीच्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. निधीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या रोड ट्रीपचे अनेक व्हिडीओ आणि फोटो पाहायला मिळतात. देशाभरातील फारश्या प्रकाशात न आलेल्या सुंदर ठिकाणांना भेट देत त्या सुंदर ठिकाणांची मजा लुटण्याची निधीला आवड आहे.
निधी अनेकदा तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. मात्र निधीने नुकत्याच शेअर केलेल्या काही बोल्ड फोटोंमुळे चाहत्यांचा गोंधळ उडाला आहे. निधीने तिच्या नव्या फोटोशूटमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. यात निधीचा हटके लूक पाहायला मिळतोय. या फोटोत तिने पिंक स्पेगिटी टॉप परिधान केलंय. तिच्या कुरळ्या केसांचे तिने दोन हाफ बन बांधले आहेत. तर निळ्या रंगाच्या आयशॅडोसह निधीचा मेकअपही नेटकऱ्याचं लक्ष वेधून घेतोय. या फोटोत तिने दोन हुला हुप्स खांद्यावर घेतलेले दिसत आहेत.
हे देखील वाचा: राज कुंद्राच्या अटकेनंतर मुलगा वियानने शेअर केली पहिली पोस्ट
यात फोटोला निधीने एक सुंदर कॅप्शनही दिलंय. “आपलं मन म्हणजे आकाशापलीकडे विस्तारत जाणारा सुंदर रंगांचा प्रवाह आहे.” अशा आशयाचं कॅप्शन तिने दिलंय.
View this post on Instagram
हे देखील वाचा: “लाज वाटली पाहिजे” म्हणत ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्याला दिव्यांका त्रिपाठीचं उत्तर
निधीने फोटो शेअर करताच अनेकांनी तिच्या या फोटोला पसंती दिलीय. तर काही नेटकऱ्यांनी निधीच्या फोटोवर विचित्र कमेंट केल्या आहेत. एक युजर कमेंट करत म्हणाला, “तू चुकीच्या ठिकाणी काम करतेयस तू डिस्नेला जायला हवं”.तर दुसरा म्हणाला, “ही काय होती आणि काय झाली.” तर आणखी एक नेटकरी म्हणाला, “तू खूप बदलली आहेस गं”

काही दिवसांपूर्वीच निधीचा बिकिनीतील व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर निधी ‘बिग बॉस १५’ मध्ये झळकणार अशा चर्चा देखील रंगू लागल्या होत्या.