scorecardresearch

‘तारक मेहता…’ फेम बबीताने सुरु केलं रेस्टॉरंट, अभिनय क्षेत्राला करणार रामराम?

मुनमुनने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नवीन रेस्टॉरंट सुरु केल्याची माहिती दिली आहे.

taarak mehta ka ooltah chashmah, munmun dutta,
मुनमुनने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नवीन रेस्टॉरंट सुरु केल्याची माहिती दिली आहे.

छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यात मालिकेतील बबीता म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ता ही गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. मुनमुन सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच एक व्हिडीओ शेअर करत मुनमुनने नवीन रेस्टॉरंट सुरु केल्याचे सांगितले आहे.

मुनमुनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. मुनमुनने तिचा मानलेला भाऊ म्हणजेच मॅनेजर क्यूर सेठ यांच्यासोबत मिळून एक नवीन रेस्टॉरंट सुरु केलं आहे. दोघे गेल्या १४ वर्षांपासून एकत्र आहेत. हे रेस्टॉरंट एक जॉइंट वेंचर असेल आणि त्यांच नाव फेब 87 असे आहे. मुनमुनने तिच्या या फूड बिजनेसबद्दल सांगण्यासाठी एक व्हिडीओ शेअर करत म्हणाली, याच गुजराती स्पेशल, चायनीज, कॉन्टिनेंटल आणि अशा अनेक प्रकारचे पदार्थ मुंबईकरांना मिळणार आहेत.

Viral Video : ‘कच्चा बदाम’ फेम भुबन बड्याकरने पंचतारांकित हॉटेलमध्ये केला लाइव्ह परर्फोमन्स, प्रेक्षक भारावले

आणखी वाचा : ‘हा’ लोकप्रिय अभिनेता साकारणार ‘शक्तिमान’ ही भूमिका

दरम्यान, सोशल मीडियावर मुनमुनची ही पोस्ट पाहिल्यानंतर ती अभिनय सोडणार का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला होता. तर असं काही नसून तिने तिच्या भावासोबत नवीन व्यवसाय सुरु केला आहे. मुनमुन दत्ताने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. पण तिला खरी लोकप्रियता ही ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील बबीता या भूमिकेमुळे मिळाली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Taarak mehta ka ooltah chashmah s munmun dutta opened a restaurant dcp