‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानीचा आज वाढदिवस आहे. दिशाचा जन्म १७ ऑगस्ट १९७८ साली झाला. आज दिशा तिच ४६ वा वाढदिवस साजरा करत आहे. दिशाने ऐश्वर्या राज बच्चन शाहरूख खान आणि बॉलिवूडमधील अनेक कलाकारांसोबत काम केले आहे. मात्र, तिला खरी लोकप्रियता ही ‘तारक मेहता…’ मालिकेतील दयाबेन या भूमिकेमुळे मिळाली आहे. दिशाने २००९ ते २०१८ पर्यंत ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत काम केले.

२०१८ मध्ये दिशाने मालिकेचा निरोप घेतला. त्यानंतर दिशाने पुन्हा मालिकेत यावं अशी इच्छा तिच्या चाहत्यांची होती. मात्र, त्यावर दिशाने कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याने सोशल मीडियावर तिला अश्लील पोस्ट शेअर केल्या. त्यानंतर दिशाने त्या ट्रोल्सला सडेतोड उत्तर दिले होते. दिशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले होते. ‘तुमच्यासाठी हा शेवटचा इशारा आहे. मला टॅग करण बंद करा, अश्लील पोस्ट शेअर करण बंद करा. तुम्ही खूप वाईट कॉन्टेंट शेअर करत मला टॅग करत आहात. बाकी सगळं ठीक आहे पण अशा पोस्ट करू नका,’ अशा आशयाचे कॅप्शन दिशाने त्या पोस्टला शेअर करत दिले होते.

आणखी वाचा : ‘माधुरी दीक्षित दे, आम्ही लगेच इथून निघून जाऊ’, पाकिस्तानच्या मागणीला कॅप्टन विक्रम बत्रांनी दिले होते ‘असे’ उत्तर

disha vakani, daya ben,
दिशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले होते.

आणखी वाचा : याला म्हणतात खरं प्रेम! विक्रम बत्रा यांची प्रेयसी आजही आहे अविवाहीत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिशा गर्भवती असल्यापासून मालिकेत दिसली नाही. त्यानंतर तिने मालिकेत काम केले नाही. दिशा पुन्हा शोमध्ये येणार अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. एवढंच नाही तर एका वृत्तानुसार दिशा एका एपिसोडसाठी १ लाख ५० हजार रुपये मानधनाची मागनी केली होती. मात्र, निर्मात्यांनी त्यासाठी नकार दिला. तर या आधी दिशा एका एपिसोडसाठी १ लाख २५ हजार रुपये घेत असल्याचे म्हटले जाते.