हिंदी चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, जे वर्षानुवर्षे एकत्र स्क्रीन शेअर करत आले आहेत. अशीच एक अत्यंत लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री तब्बू. अजय आणि तब्बू यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. तर गेल्या काही दिवसांपासून अजय आणि तब्बू त्यांच्या आगामी ‘भोला’ या चित्रपटामुळे चर्चेचा केंद्रबिंदू आहेत. या चित्रपटाच्या घोषणेपासून याची प्रेक्षकवर्गात उत्सुकता होती. गेले अनेक दिवस या चित्रपटाचे शूटिंग सुरु होते. अखेर नुकतेच अजय आणि तब्बूने ‘भोला’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.

आणखी वाचा : अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या तब्येतीबद्दल केले मोठे विधान, म्हणाले, “मी रोज….”

uddhav thackeray slams narendra modi during in an interview with the indian express
मोफत धान्य देण्यापेक्षा रोजगार का देत नाही? ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांचा मोदींना सवाल
DD News Logo changed
‘हे तर सरकारी माध्यमांचे भगवीकरण’, डीडी न्यूजच्या लोगोचा रंग केशरी केल्यानंतर विरोधकांची टीका
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
Municipal Corporation ignoring quakes in navi mumbai delayed in making rule for builders
नवी मुंबई : हादऱ्यांच्या मालिकेकडे महापालिकेचा काणाडोळा, बिल्डरांच्या सोयीसाठी नव्या नियमावलीला मुहूर्त सापडेना

अजय देवगण आणि तब्बू यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत ही माहिती दिली आहे. तब्बूने तिच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “बघा, आम्ही आमचा ९ वा चित्रपट एकत्र पूर्ण केला आहे.” या शेअर केलेल्या पोस्टमध्ये अजय आणि तब्बू एकत्र उभे असल्याचे दिसत आहेत. या फोटोत अजय आकाशाकडे बोटे दाखवत तब्बूला काहीतरी दाखवत आहे आणि ते बघताना तब्बूच्या चेहऱ्यावर हसू दिसत आहे.

तब्बू या आगामी भोला या चित्रपटात पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः अजय देवगणने केले आहे. तब्बूची अजयबरोबरची ही पोस्ट पाहून त्यांचे चाहते या चित्रपटासाठी खूप उत्सुक झाले आहेत. एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये लिहिले, ‘अभिनंदन…हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरणार आहे.’ तर दुसर्‍या नेटकऱ्याने लिहिले, ‘आता आम्ही या चित्रपटाची आणखी वाट बघू शकत नाही.’

हेही वाचा : ठरलं… ‘या’ दिवशी येणार कियारा आडवाणी आणि कार्तिक आर्यनचा ‘सत्यप्रेम की कथा’

अजय आणि तब्बूचा हा ९ वा एकत्र चित्रपट आहे. यापूर्वी त्यांनी ‘विजयपथ’, ‘हकीकत’, ‘तक्षक’, ‘दृश्यम’, ‘गोलमाल अगेन’, ‘दे दे प्यार दे’, ‘फितूर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि आता दोघे ‘भोला’मध्ये एकत्र दिसणार आहेत.