scorecardresearch

Premium

सेन्सॉर सर्टिफिकेट्ससाठी ६.५ लाख द्यावे लागले, तामिळ अभिनेत्याचा आरोप; शिंदे, मोदींना आवाहन

तामिळ अभिनेता विशाल मुख्यमत्री एकनाथ शिंदे व पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत म्हणाला…

Tamil Actor Vishal talks about corruption in the film censor board
तमिळ अभिनेत्याने तक्रार केलेलं प्रकरण नेमकं काय? (फोटो – नरेंद्र मोदी – ANI, विशाल – व्हिडीओतून स्क्रीनशॉट, एकनाथ शिंदे – फेसबूक)

तामिळ अभिनेता विशालने गुरुवारी (२८ सप्टेंबर रोजी) सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत चित्रपट उद्योगातील भ्रष्टाचाराविषयी भाष्य केलं आहे. त्याचा चित्रपट ‘मार्क अँटनी’ हिंदीत प्रदर्शित करण्यासाठी सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्याला ६.५ लाख रुपये द्यावे लागले, असा दावा त्याने या व्हिडीओत केला आहे. तामिळ चित्रपट ‘मार्क अँटनी’मध्ये विशाल व सूर्याने मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

Video: राजकीय वादाचा सिनेमाला फटका, आंदोलकांनी गोंधळ घालत अभिनेता सिद्धार्थचा कार्यक्रम पाडला बंद

Pankaj Tripathi
“माफियाची भूमिका दिली, पण चित्रीकरणावेळी मला…”, पंकज त्रिपाठींनी सांगितला पदार्पणाचा किस्सा
tu chal pudha fame actress dhanashree kadgaonkar
“प्रसूतीनंतर काम कसं सांभाळलंस?”, ‘तू चाल पुढं’ फेम अभिनेत्रीने एका शब्दात दिलं उत्तर…
Bigg boss marathi fame Utkarsh Shinde
“जिच्या पायाला मी स्पर्श करून…” उत्कर्ष शिंदेची अभिनेत्री हर्षदा खानविलकरसाठी खास पोस्ट, म्हणाला…
Adinathh
आदिनाथ कोठारे बनला रॅपर! या हटके अंदाजाबद्दल भाष्य करत अभिनेता म्हणाला…

तमिळ अभिनेता विशाल म्हणाला, “हा व्हिडीओ माझ्या (मार्क अँटनी) चित्रपटाच्या संदर्भात CBFC मुंबईत झालेल्या घोटाळ्याबद्दल आहे…मला ही बाब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान मोदी यांना लक्षात आणून द्यायची आहे. आम्ही चित्रपट प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज केला होता पण सीबीएफसी कार्यालयात जे घडले ते पाहून आम्हाला धक्का बसला. सोमवारी जेव्हा माझ्या एका माणसाने त्या ठिकाणी भेट दिली तेव्हा आम्हाला प्रमाणपत्रासाठी रुपये ६.५ लाख भरण्याचा पर्याय देण्यात आला होता. आम्हाला आधी चित्रपट पाहण्यासाठी ३ लाख रुपये पाठवायचे होते आणि नंतर प्रमाणपत्रासाठी उर्वरित ३.५ लाख रुपये द्यायचे होते. माझ्याकडे कोणताही पर्याय नव्हता, मला पैसे द्यावे लागले. मला प्रमाणपत्र मिळाले आणि ‘मार्क अँटनी’ हा चित्रपट उत्तर भारतात प्रदर्शित झाला. पण हे दुर्दैव आहे. हे सगळं सरकारी कार्यालयात घडत आहे, मी उच्च अधिकार्‍यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती करतो.”

रविचंद्रन दिग्दर्शित हा चित्रपट १५ सप्टेंबर रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. १५ दिवसांत चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५० कोटींची कमाई केली आहे. ‘मार्क अँटनी’ हिंदी भाषेत प्रदर्शित करण्यासाठी प्रमाणपत्र हवे होते, त्यासाठी ६.५ लाख रुपये भरावे लागले, असा दावा विशालने या व्हिडीओमध्ये केला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tamil actor vishal talks about corruption in the film censor board complaint to cm eknath shinde and pm modi hrc

First published on: 29-09-2023 at 10:11 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×