बरेच दाक्षिणात्य अभिनेते सध्या बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास उत्सुक आहेत. अल्लू अर्जुन लवकरच भूषण कुमारच्या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे, तर विजय सेतुपतीने आधीच पदार्पण केले आहे. आता तामिळ चित्रपटसृष्टीतील स्टार सूर्याबद्दल एक बातमी समोर येत आहे. सुर्या लवकरच दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे.

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, राकेश ओमप्रकाश मेहरा ‘महाभारत’मधील कर्ण या व्यक्तिरेखेवर चित्रपट बनवत आहेत. सूर्याने या चित्रपटात काम करायची इच्छा व्यक्त केल्याचंही म्हंटलं जात आहे. सूर्या हा तमिळ चित्रपटसृष्टीतील सगळ्यात महागडा अभिनेता आहे. सध्या राकेश ओमप्रकाश मेहरा हे त्यांच्या या चित्रपटात ‘कर्ण’ या भूमिकेसाठी सूर्याशी चर्चा सुरू असल्याचं म्हंटलं जात आहे.

आणखी वाचा : रेखा यांनी किती लग्नं केली? बिग बी ते अक्षय कुमारसारख्या कलाकारांबरोबर जोडलेलं नाव

काही रीपोर्टनुसार राकेश ओमप्रकाश मेहरा आणि सूर्या यांच्यातील ही चर्चा जवळपास पूर्ण झाली असून लवकरच सूर्या या चित्रपटावर काम सुरू करेल. इतकंच नव्हे तर लवकरच या चित्रपटाची अधिकृत घोषणादेखील करण्यात येणार आहे. अशी चर्चा आहे की ‘कर्ण’ या पात्रावर आधारित हा चित्रपट २ भागात सादर केला जाणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चित्रपटाचे शूटिंग २०२४ मध्ये होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुर्या सध्या त्याच्या ‘कांगुवा’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तो प्रथम या चित्रपटाचे शूट पूर्ण करणार आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा देखील त्यांच्या या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहेत. राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे, ज्यावर ते गेली बरीच वर्षं काम करत असल्याचं सांगितलं जात आहे.