हिंदी टीव्ही जगतातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून नावारुपास आलेली तेजस्वी प्रकाश सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. लवकरच ती एका मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटात ती लक्ष्मीकांत बर्डेचा मुलगा अभिनय बर्डेसह स्क्रीन शेअर करणार आहे. तेजस्वी प्रकाशच्या ‘मन कस्तुरी रे’ या रोमँटिक चित्रपटाची बऱ्याच काळापासून चर्चा असून नुकतंच या चित्रपटाचं नवं पोस्टर प्रदर्शित झालं आहे.

हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांचा मराठी सिनेमांसाठीचा रस वाढत असतानाच तेजस्वी प्रकाश हिने ‘मन कस्तुरी रे’ या मराठी सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. यानिमित्ताने तेजस्वीने सोशल मीडियावर नवरात्रीच्या शुभेच्छा देत आपल्या या पोस्टरबाबत खूप उत्सुक असल्याचे सांगितले. तिचा हा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. मराठमोळ्या तेजस्वीची पहिल्यांदाच मराठी सिनेमातील दमदार झलक पाहायला सर्वच प्रेक्षकवर्ग आतुर असतानाच आता तेजस्वी प्रकाश आणि अभिनय बेर्डेचे नाचतानाचे एक जबरदस्त पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. पोस्टरमधील या दोघांची कमाल केमेस्ट्री प्रेक्षकांची सिनेमासाठीची उत्सुकता अधिकच वाढवत आहे.

आणखी वाचा-तेजस्वीने बॉयफ्रेंड करण कुंद्राला न सांगताच उरकला साखरपुडा? अभिनेता तिच्या पोस्टवर कमेंट करत म्हणाला….

तेजस्वी प्रकाशने तिच्या या आगामी मराठी चित्रपटाचं पोस्टर शेअर करताना इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे. पोस्टर शेअर करताना तिने लिहिलं, “प्रेमाच्या आकाशात सोनेरी स्वप्ने सजविणाऱ्या दोन मनांची गोष्ट..! सादर आहे अभिनय बेर्डे आणि तेजस्वी प्रकाश यांच्या ‘मन कस्तुरी रे’ सिनेमाचं रोमँटिक पोस्टर…! सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.” तेजस्वीचा हा पहिलाच मराठी चित्रपट असून याची मागच्या बऱ्याच काळापासून चर्चा आहे. अशात तेजस्वीची ही पोस्टही चर्चेत आली आहे.

आणखी वाचा- बॉडी शेमिंगच्या मुद्द्यावर तेजस्वी प्रकाशने केलं भाष्य; म्हणाली, “लोकांना…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नितीन केणी यांच्या नेतृत्वाखाली मुंबई मुव्ही स्टुडिओज प्रस्तुत, व्यंकट अत्तिली, मृत्यूंजय किचंबरे यांच्या आयएनइएनएस डायमेंशन एन्टरटेनमेंट ॲण्ड आर्ट्स निर्मित या चित्रपटाचे सहनिर्माते ड्रॅगन वॅाटर फिल्म्सचे निशीता केणी आणि करण कोंडे आहेत. वितरणाचे काम युएफओ सिने मीडिया नेटवर्कने पाहिले आहे.