अभिनेत्री हिना खान ही छोट्या पडद्या बरोबरच बॉलिवूडमध्ये सुद्धा आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. तिने ‘ये रिश्ता क्या कहलता हैं’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. या मालिकेतील अक्षरा या भूमिकेने लाखो प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. जवळ -जवळ आठ वर्षं ही भूमिका साकारल्यावर तिने ‘बिग बॉस’ आणि ‘खतरों के खिलाडी’ या रिअॅलिटी शो मध्ये भाग घेतला. ‘बिग बॉस १३’ मध्ये ती महाअंतिम फेरी पर्यंत पोहचली होती. जरी हिना ‘बिग बॉस’ या शोची विजेती झाली नसली तरी तिने लाखो लोकांचे मन जिंकले आहे आणि लवकरच ती साऊथ चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
हिना खान साऊथचा सुपरस्टार प्रभास सोबत ‘वृंदावन’ या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार असल्याची माहिती मिळत आहे. हिना आणि प्रभासला एकत्र काम करताना पाहणे हे त्यांच्या चाहत्यांसाठी एक ट्रीट ठरणार आहे एवढे नक्की. हिना खान अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत असून तिचा आता पर्यंतचा प्रत्येक शो सुपर हिट ठरला आहे. तसंच प्रभासने देखील अनेक लोकप्रिय चित्रपटात काम केले आहे. प्रभास आणि अभिनेत्री पूजा हेगडे प्रमुख भूमिका असलेली ‘राधे श्याम’ हा चित्रपट सध्या बराच चर्चेत आहे. जन्माअष्टमीच्या मुहूर्तावर या चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाचा पहिला लुक प्रदर्शित केला. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे असं सांगितलं जात आहे.
View this post on Instagram
दरम्यान हिना खान सोशल मीडियावर सक्रिय असते आणि ती तिच्या व्हिडिओ आणि फोटोच्या माध्यमातून आपले मत स्पष्टपणे मांडताना दिसते. काही दिवसांपूर्वी हिना खानचा साडीतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होता. यात हिना खान मेकअप करताना दिसून येते होती. तिच्या या बोल्ड अंदाजातील व्हिडिओमुळे हिना ट्रोलर्सच्या निशण्यावर होती.