आई कुठे काय करते ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणून ओळखली जाते. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत अरुंधतीच्या दुसऱ्या लग्नाची धामधूम सुरु आहे. तर अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नामुळे अनिरुद्धचा मात्र संताप होताना दिसत आहे. नुकतंच यावरुन अनिरुद्ध हे पात्र साकारणाऱ्या अभिनेते मिलिंद गवळी यांनी पोस्ट शेअर केली आहे.

मिलिंद गवळी यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ आधी ते अरुंधती बडबडताना दिसत आहे. त्यानंतर अरुंधतीही त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना दिसत आहे. मालिकेच्या काही भागांमधील हा व्हिडीओ त्यांनी पोस्ट केला आहे.

मिलिंद गवळींची पोस्ट

“काय चाललंय अनिरुद्ध ?
अरे आता तरी सोड अरुंधतीला , लग्न झालंय तिचं.

आता अनिरुद्ध अरुंधतीशी ज्यावेळेला बोलायला जातो आणि त्याचे मुद्दे मांडतो त्यावेळेला मला हा पाकिस्तानचा पंतप्रधान कश्मीर विषयी बोलतोय असं वाटायला लागतं.

divorce
बातमी वाचली तर मला हाच सीन डोळ्यासमोर आला
“पाकिस्तान हर जगह कश्मीर राग अलापता रहता है और हर बार मुंह की खाता है। भारत जानता है कि आतंक को पालने वाला पाकिस्तान किस तरह के नापाक मंसूबे रखता है। भारत ने मुंहतोड़ जवाब देते हुए कहा है कि वह कश्मीर मुद्दे के बजाय पाकिस्तान में मौजूद आतंकियों से मुकाबला करने पर ध्यान दें, जो लंबे वक्त से भारत के जम्मू कश्मीर को निशाना बनाते रहे हैं।”

याच पद्धतीने अरुंधती अनिरुद्ध ला सडेतोड उत्तर देते त्याचे सगळे मुद्दे खोडून काढते,
अनिरुद्ध ला सल्ला देते की लवकर बरे व्हा, स्वतःची काय अवस्था करून घेतली आहे ती बघा, अजून खालच्या पातळीवर जाऊ नका,
पण अनिरुद्ध काय सुधारायचं नाव घेत,
जी गोष्ट आपल्या हातून निष्डून गेली आहे त्या गोष्टीच्या मागे पडण्यात काहीच अर्थ नाही हे त्याला कळत नाही,
खूपशा माणसांचं असंच होतं, ते मागचं सोडून द्यायला तयार नसतात, त्यांचा अहंकार त्यांना तसं करू देत नाही, मागचं सगळं पुसून नव्याने सुरुवात करायची हिम्मत नसते त्यांच्यात,
आणि मग सतत अपमानित होत असतात,
अनिरुद्ध जितका अपमानित झाला आहे तितका क्वचितच कोणी होत असेल, त्याचा अहंकार ठेचायला सगळ्यांनाच आवडतं, परवाच्या एपिसोडमध्ये अनघा म्हणाली बाबा तुम्ही विकृत आहात, इशा म्हणाली मला तुम्हाला बाबा म्हणायची लाज वाटते,
सुलेखाताई म्हणाल्या तुम्हाला सम उपदेशनाची गरज आहे.
पण तुम्ही कितीही काहीही त्याला म्हणा तो काय सुधारायचं नाव घेत”, असे मिलिंद गवळींनी म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान मिलिंद गवळी यांच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहेत. तो कसाही असला तरी अनिरुद्ध शिवाय ही मालिका अपूर्ण आहे. पाहणारी लोक फक्त अनिरुद्धच्याच सीनची वाट पाहत असतात, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. त्यावर मिलिंद गवळी यांनीही हार्ट इमोजी शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.