मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सध्या राज्यभरात आंदोलन सुरू आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देत आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्याच्या आंतरवाली येथे जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं आहे. सरकार मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणासंदर्भात आता मराठी कलाविश्वातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

हेही वाचा : ‘असा’ झाला होता माधुरी दीक्षितचा लग्न सोहळा, अनेक वर्षांनी खुलासा आली म्हणाली, “अमेरिकेत भावाच्या घरी…”

अलीकडे बरेच मराठी कलाकार सामाजिक गोष्टींवर भाष्य करताना आपल्याला दिसतात. जरांगे पाटलांच्या उपोषणासंदर्भात ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री अश्विनी महांगडेने शेअर केलेल्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. यापूर्वी ‘बिग बॉस’ फेम अभिनेते किरण माने यांनी या प्रकरणी भाष्य केलं होतं.

हेही वाचा : “संविधान गुंडाळू पाहणार्‍या व्यवस्थेला…” मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाबद्दल किरण मानेंची पोस्ट; म्हणाले, “आम्हाला तुमची…”

मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस असल्याने त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. याबद्दल अश्विनी लिहिते, “…आणि पाटील साहेबांना काही झालं तर सरकारने त्याचीही तयारी ठेवा. आता आमच्यावर नुसता लाठीचार्ज करून उपयोग होणार नाही…एक मराठा लाख मराठा!” या पोस्टसह अभिनेत्रीने जरांगे पाटील उपोषणाला बसल्याचा फोटो शेअर केला आहे.

हेही वाचा : Vikram Gokhale Birth Anniversary : विक्रम गोखलेंनी सात वर्षांसाठी मनोरंजन क्षेत्रातून संन्यास का घेतला होता?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
ashwini mahangade
अश्विनी महांगडे पोस्ट

दरम्यान, अभिनेत्री अश्विनी महांगडे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. अभिनय क्षेत्राबरोबरच विविध राजकीय व सामाजिक मुद्द्यांवर ती आपलं स्पष्ट मत मांडताना दिसते. यापूर्वी देखील अश्विनीने जालन्यातील लाठीचार्ज प्रकरणी संतप्त पोस्ट शेअर करून मराठा आंदोलकांना पाठिंबा दिला होता. तिच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर अभिनेत्री सध्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अश्विनी महत्त्वाची भूमिका साकारत आहे.