कलाकारांच्या खासगी आयुष्याबाबत सोशल मीडियावर कायमच चर्चा रंगताना दिसते. कलाकारांचं लग्न असो वा एखाद्या अभिनेत्रीची प्रेग्नंसी चाहत्यांना याबाबत जाणून घेण्यास अधिक उत्सुकता असते. काही मंडळी आपल्या खासगी आयुष्याबाबत खुलेपणाने बोलताना दिसतात तर काही आपली प्रत्येक गोष्ट सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण अभिनेत्री राधा सागर याला अपवाद आहे. राधाने एक सुंदर व्हिडीओ चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.

‘आई कुठे काय करते’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ यांसारख्या कार्यक्रमांमध्ये राधाने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. तिने साकारलेल्या भूमिकांचं सर्वत्र कौतुकही झालं. आता राधाने तिच्या कामामधून ब्रेक घेतला आहे. यामागचं कारणंही तितकंच खास आहे. राधाने सुंदर व्हिडीओ शेअर करत गरोदर असल्याची बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे. तिचा गरोदरपणातील व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – “माझे वय ६० वर्ष नाही तर…”, व्हिडीओ शेअर करत आशिष विद्यार्थी यांचा खुलासा, दुसऱ्या पत्नीच्या वयाबाबत म्हणाले…

राधाने तिचा पती सागर याच्याबरोबर गरोदरपणात खास फोटोशूट केलं. शिवाय सुंदर व्हिडीओही शूट केला. हाच व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामद्वारे शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती अगदी आनंदी दिसत आहे. तसेच वेस्टर्न कपडे परिधान करुन तिने खास फोटोशूट केलं आहे. राधाच्या चेहऱ्यावर गरोदरपणाती ग्लो दिसून येत आहे. काही मिनिटांमध्येच तिच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली आहे.

आणखी वाचा – साध्या पद्धतीने लग्न पण दत्तू मोरेचं रिसेप्शन थाटामाटात पार, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या कलाकारांनी लावली हजेरी

View this post on Instagram

A post shared by Radha Sagar (@radhasagarofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राधासाठी हा दिवस खास आहे. कारण आज तिचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त ही गोड बातमी तिने सगळ्यांबरोबर शेअर केली. व्हिडीओ शेअर करत राधाने म्हटलं की, “आमच्या आयुष्यामधील सगळ्यात उत्तम बातमी सांगण्यासाठी हा चागला दिवस आहे. मला वाढदिवसाच्या शुभेच्छा”. या व्हिडीओनंतर अनेक मंडळींनी राधाचं अभिनंदन केलं आहे.