‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेले अभिनेते मिलिंद गवळी हे कायमच चर्चेत असतात. या मालिकेत ते अनिरुद्ध देशमुख ही व्यक्तिरेखा साकारताना दिसतात. या मालिकेमुळेच ते घराघरात पोहोचले. नुकतंच मिलिंद गवळी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.
नुकतंच मिलिंद गवळींनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत ते एका गायीच्या गोठ्यात गेल्याचे दिसत आहे. याला त्यांनी एक कॅप्शनही दिले आहे. त्यामुळे ते चर्चेत आले आहेत.
आणखी वाचा : “…म्हणून लोक आजारी पडत असतील का?” मिलिंद गवळींच्या पोस्टने वेधलं लक्ष
मिलिंद गवळींची पोस्ट
“हंबरून वासराले चाटती जवा गाय,
तिच्यामंध्ये दिसती मले तवा माझी माय “.
काही दिवसांपूर्वी रावेत पुण्याचे श्री रविशंकर सहस्त्रबुद्धे यांच्या गोशाळेत जाण्याचा योग आला, ते भारता मधले प्रख्यात pure breed गीर गाईंच्या जातीचे संशोधक, अभ्यासक आहेतच, आणि त्यांच्या गो शाळेमध्ये शंभरहून अधिक गीर जातीच्या गायी आहेत , अतिशय सुंदर पद्धतीने त्यांच्या कडे त्या गाईंची निगा ठेवली जाते, ते सगळं पाहून मन भारावून गेलं आणि भरूनही आलं,श्रीकृष्णाच्या गोकुळात गेल्यासारखं वाटलं, आणि माझ्या नावातच गवळी आहे, त्यामुळे गाईंच्या सानिध्यात राहणं माझा अधिकारच आहे, कदाचीत म्हणून च गाईंच्या सानिध्यात माझं मन रमतं, आणि रविशंकर यांसारख्ये व्यक्ती ज्यांना गाईन विषयी एवढं ज्ञान आहे, आणि खूप छान पद्धतीने ते गाईंची काळजी घेतात, त्यामुळे त्यांच्याबद्दलचं माझं प्रेम आणि आदर खूप खूप वाढला आहे. त्यांची गोशाळा बघून , त्यांचं ज्ञान जाणवून त्यांच्याबद्दल मला खूप हेवा वाटला, आपण गवळी असून आपल्याला या जन्मात असं काही जमणार नाही याचीही खंत वाटली.
त्या आधी एकदा इस्कॉनच्या गोवर्धन आश्रमात जाण्याचा पण योग आला होता, तिथेही गाईंची निगा फार छान पद्धतीने ठेवली जाते, आणि माझा कॉलेजचा मित्र जो आता प्रसिद्ध निर्माता आहे शशांक सोळंकी , त्याने त्याच्या वाड्याला असलेल्या फॉर्मवर गाय पाळली आहे, खरंच मला हेवा वाटतो हा सगळ्या गोष्टींचा.
आजच्या काळामध्ये शहरात राहणाऱ्या लाल गाईला घरी आणणं, ही तर अशक्य गोष्ट वाटते. पूर्वीच्या काळी गावात प्रत्येक घरात एक तरी गाय असायचीच, असं म्हटलं जायचं ज्याच्या घरी गाय आहे, त्याच्या घरी मुलं बाळ दुष्काळात पण उपाशी राहणार नाहीत, आपल्या देशामध्ये असं म्हटलं जातं की गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देव असतात , गाईची पूजा केली जाते, कितीतरी वेळेला माझ्या आईने मला गाई साठी काढून ठेवलेला नैवेद्य “गाईला भरून ये असं सांगितलं” आणि मी मोटरसायकल वर्रून गाय शोधत अनेक वेळेला फिरलेलो आहे. माहींमच्या शितळादेवी मंदिरात गाय वाल्या मावशी आणि माझी चांगली ओळखही झाली होती.
माझ्या आईची गाई वर खूप श्रद्धा होती. रविशंकरांबरोबर चर्चा करत असताना लक्षात आलं की ,
आपल्या देशात अनेक ठिकाणी अजूनही गायांची फार काळजी घेतली जात नाही”, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान मिलिंद गवळी यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. मिलिंद गवळी यांच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहे. “तुम्ही खूप छान पोस्ट केली आहेत, खरंच तुम्ही फार नशीबवान आहात”, अशी कमेंट एकाने या पोस्टखाली केली आहे. तर एकाने “किती छान… सुंदर” असे म्हटले आहे.
