नववर्षाच्या पार्श्वभूमीवर आज सर्वत्र आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी नववर्षानिमित्त विविध संकल्प केले आहेत. ‘आई कुठे काय करते’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अश्विनी महांगडेने देखील नववर्षाचा खास संकल्प केला आहे. तिने नुकतीच यासंदर्भात पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांना माहिती दिली आहे.

इंग्रजी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अभिनेत्री आपल्या होणाऱ्या नवऱ्यासह कोल्हापूरच्या जोतिबा मंदिरात दर्शन घेण्यासाठी पोहोचली होती. यावेळी त्यांच्याबरोबर कुटुंबीय देखील उपस्थित होते. मंदिर परिसरातील काही फोटो अश्विनीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. अभिनेत्रीने गेल्यावर्षी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव निलेश जगदाळे असं आहे.

हेही वाचा : मुहूर्त ठरला, रकुल प्रीत – जॅकी भगनानी गोव्यात ‘या’ दिवशी बांधणार लग्नगाठ? बँकॉकच्या बॅचरल पार्टीचा फोटो व्हायरल

अश्विनी महांगडे या फोटोंना कॅप्शन देत लिहिते, “इंग्रजी नवीन वर्षांत काय नवीन संकल्प करावा बरं? असे मनात आले आणि आम्ही संकल्प केला की महाराष्ट्रातील सर्व देवस्थानं, मंदिर, गड- किल्ले यांच्या चरणी नतमस्तक व्हायचे. आज सुरुवात केली… पहिलं देवस्थान कोल्हापूरचं जोतिबा मंदिर”

हेही वाचा : “दोन महिन्यांपासून डेंग्यू अन्…”, अमृता खानविलकरचा गंभीर आजारांशी सामना; म्हणाली, “खचून न जाता…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिनेत्री व तिच्या जोडीदाराचा नववर्षाचा हा अनोखा संकल्प वाचून सध्या नेटकरी या जोडप्याचं भरभरून कौतुक करत आहेत. “जय शिवराय”, “अगदी छान सुरुवात केली अभिनंदन” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी अश्विनीने शेअर केलेल्या पोस्टवर केल्या आहेत. दरम्यान, सध्या अभिनेत्री बहुचर्चित ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. यामध्ये तिने अभिच्या बायकोचं म्हणजेच अनघा हे पात्र साकारलं आहे.