अभिनेत्री रूपाली भोसले ही मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या ती ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रुपालीचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. तिच्या आयुष्यात काय सुरू आहे हे ती सोशल मीडियावरून चाहत्यांशी शेअर करत असते. तर आता नुकताच तिने तिला आलेला कोल्हापूरच्या अंबाबाईचा एक अनुभव सांगितला आहे.
स्टार प्रवाह वाहिनीने गणेशोत्सवानिमित्त एका खास कार्यक्रमाचं आयोजन जाणं आहे. या कार्यक्रमामध्ये रूपाली एक डान्स करणार आहे. हे सादरीकरण तिच्यासाठी खूप खास ठरलं आहे. याबद्दल नुकतीच तिने एक पोस्ट शेअर केली ज्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
तिने या नृत्य सादरीकरणाच्या दरम्यानचा तिचा एक फोटो शेअर करत लिहिलं, “कोल्हापूर नगरातील श्री महालक्ष्मी मंदिर हे ५२ शक्तिपीठांपैकी एक आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. या पीठाचा उल्लेख पुराणांमध्ये आढळून येतो. माझा जन्म मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी झाला. आई मला बोलली बाकी उपास केले नहीं तरी मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार करायचे पण मी जमेल तसे बाकीचे उपास तर करतेच पण हे गुरुवार सुधा करते. जन्म झाला तेव्हा आई-बाबांना लक्ष्मी आली घरात अस वटल असेल का हा प्रश्न मला कायम पडायचा.. पण वाटलं असेल कारण आई बाबांनी कायम लक्ष्मीसारखंच वागवलं आणि आई चा आशीर्वादसुद्धा कायम पाठिशी आहे आणि असेल.”
हेही वाचा : “तो मला एकटीला…” रुपाली भोसलेने ‘त्याच्यासाठी’ केलेली पोस्ट चर्चेत
पुढे तिने लिहिलं “स्टार प्रवाहच्या एका कार्यक्रमासाठी कोल्हापुरला गेले होते पण महालक्ष्मीचं दर्शन घेता आलं नाही मनाला खुप त्रास झाला, आजसुद्धा होतो पण शेवटी ती आई च ना तिला मझ्या मनातली भावना समजली आणि जणू तीच भेटायला आली. ह्या वर्षीच्या स्टार प्रवाह गणेश उत्सवची तालीम करायला गेले आणि मला सांगितले की मी कोल्हापुरची महालक्ष्मी आहे आणि मी लगेच माझ्या आईला आणि मम्माला कॉल केला आणि सांगीतल… हा योगायोग आहे की काय पण हे सगळं त्या आईने च केल अस मला वाटत.. इच्छा शक्ति आणि मनापासून मारलेली हाक देवा पर्यंत पोहचते हे खरच आहे. स्टार प्रवाहचे खरंच आभार. खुप भरभरून लिहिल आहे गोड मानून घ्या व्यक्त झाले आणि पहिल्यांदा इतकं लिहिलं. वैभव घुगे आणि त्याच्या टीमचे आभार.” तर आता तिच्या या पोस्टवर कमेंट करत नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.