सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून नवी मालिका जुन्या मालिकांची जागा घेताना दिसत आहेत. येत्या काळातही बऱ्याच नव्या मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाल्या आहेत. अशातच ‘झी मराठी’ची नवी मालिका ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील एक कलाकार झळकला आहे.

गेल्या चार वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने लोकप्रियतेची एक वेगळी उंची गाठली आहे. या मालिकेत अनेक कलाकार वेगवेगळ्या भूमिकेत पाहायला मिळाले. बऱ्याच भूमिका या काही काळापुरती मर्यादित होत्या. यापैकी एक भूमिका म्हणजे साहिल. इशाचा पहिला बॉयफ्रेंड. अभिनेता अद्वैत कडणेने साहिल ही भूमिका उत्तमरित्या साकारली होती. इशा व साहिलच्या प्रेमाचा ट्रॅक प्रेक्षकांना खूप आवडला होता.

हेही वाचा – Video: स्पृहा जोशी-सागर देशमुखच्या ‘सुख कळले’ मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित, कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या…

आता ‘आई कुठे काय करते’मधील साहिल म्हणजेच अद्वैत ‘नवरी मिळे हिटलरला’ या नव्या मालिकेत झळकला. या मालिकेत लीलाची बहीण रेवतीच्या बॉयफ्रेंडच्या भूमिकेत अद्वैत पाहायला मिळाला. विक्रांत असं त्याच्या भूमिकेचं नाव आहे.

हेही वाचा – Video: रणबीर कपूर-आलिया भट्टने लेक राहासह साजरी केली होळी, व्हिडीओ आला समोर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अद्वैतने याआधी बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘जाऊ नको दूर बाबा !’, ‘अग्निहोत्र २’, ‘फुलपाखरु’ या मालिकांमध्ये तो विविध भूमिकेत झळकला होता.