अभिनेत्री अश्विनी महांगडे ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतून घराघरात पोहोचली. सध्या अश्विनी स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेत अनघाची भूमिका साकारत आहे. या मालिकेतील तिची भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. नुकतंच अश्विनीने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

काही दिवसांपूर्वी टिकलीवरुन वाद निर्माण झाला होता. याच टिकलीवरुन अश्विनीने एक पोस्ट शेअर केली आहे. अश्विनीने तिचा आईबरोबरचा टिकली लावलेला फोटो शेअर केला आहे. गेल्याच वर्षी अश्विनीच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर तिच्या आईने टिकली लावणे सोडून दिले होते. “ठसठशीत टिकली लावणारी माझी मम्मी…” असं कॅप्शन देऊन अश्विनीने तिच्या आईबद्दल खास पोस्ट लिहीली आहे.

हेही वाचा >> कार्तिक आर्यन हृतिक रोशनच्या बहिणीला खरंच डेट करतोय?, जाणून घ्या सत्य

काल साधारण नाना गेल्यानंतर दीड वर्षांनी ती घराबाहेर पडली. तिला कायम छान असे तयार व्हायला आवडायचे आणि काल मला सुद्धा वाटले की तिने आधीसारखे तयार व्हावे. कदाचित #लोक_काय_बोलतील हा विचार जसा सगळ्यांच्याच मनात येतो तसा तिच्या सुद्धा मनात आला. पण माझ्याकडे पाहून तिने तो विचार पुसला. ती आधीसारखीच गोड दिसत होती. पण काहीतरी कमी होते. काय? तिचे कपाळ.
याआधी मी खूप वेळा तिला म्हणाले की तू लाव #टिकली. तुला आवडते ना…मग. पण ती ऐकायची फक्त.

‘आई कुठे काय करते’मध्ये अनघा एकदा म्हणाली होती की, लग्नाच्या आधी सुद्धा टिकली लावतोच की मग पती गेल्यानंतर ते बंद का करायचे. मी हा विचार सहज बोलले पण परत विचार केला की तिला असेसारखे टिकली लाव बोलणे योग्य नाही. तिला वाटले तर लावेल ती. आणि काल ती स्वतः म्हणाली, ताई..टिकली लावू का गं? आधी आणि आता सुद्धा आम्ही तिच्याकडून परवानगी घेतो आणि आज #लोक_काय_बोलतील या विचारात तिने मला विचारावे? मी क्षणात म्हणाले लाव की. त्यावर सज्जूने टिकली आणून दिली आणि माझी मम्मी पुन्हा एकदा देखणी, रुबाबदार आणि अगदी नानांना जशी आवडायची तशी दिसली. रुचिका (भावा) ने तिचे, आमचे मनसोक्त फोटो काढले आणि दीड वर्षानंतर आम्ही देवदर्शनासाठी बाहेर पडलो.

काल आणखी एक अप्रतिम गोष्ट घडली. आम्ही आमच्या छकुली चा वाढदिवस साजरा केला. काल दीड वर्षानंतर पहिल्यांदा मम्मीने कुंकू हातात घेतले, छकुलीला ओवाळले. ही आमची सगळ्यात मोठी जीत आहे असे मी मानते. #लोक_काय_बोलतील यापेक्षा आता तिने तिला सांभाळावे, ज्यात खंड पडला त्या गोष्टी अनाहूतपणे होत असतील तर कराव्या. तिने आनंदी राहावे. #नाना देव होते आमच्या घराचे. ते कधी, कसे विसरता येईल. तुमच्या आईला थोडा विश्वास देण्याची गरज आहे, एकदा मिठी मारण्याची गरज आहे आणि मुख्य म्हणजे आता आपण मोठे झालो आहोत तर कधीतरी त्यांचे लाड देखील करण्याची गरज आहे.
फक्त प्रेम आणि आदर

हेही पाहा >> Photos : ‘बिग बॉस’च्या घरात गौतम विगसह लिपलॉक केल्यामुळे चर्चेत आलेली सौंदर्या शर्मा नक्की आहे तरी कोण?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अश्विनीची ही पोस्ट सोशल मीडियवर चर्चेत असून त्यावर चाहत्यांनीही कमेंट केल्या आहेत.