Aai Kuthe Kay Karte Fame Actress Shared Her Childhood Photo : ‘आई कुठे काय करते’ ही मालिका मराठी मालिकाविश्वातील प्रसिद्ध मालिकांपैकी एक होती. या मालिकेतून अनेक नवीन चेहरे नावारुपाला आले, तर काही प्रसिद्ध कलाकार मंडळींनी यामधून वेगळी भूमिका साकारत पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली, त्यामुळे आता मालिका जरी संपली असली तरी यातील कलाकारांनी साकारलेली पात्रं आजही प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून आहेत.
मालिकेतील कलाकार सोशल मीडियावरही विशेष सक्रिय असलेले पाहायला मिळतात. अशातच आता ‘आई कुठे काय करते’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे आणि तिच्या या पोस्टने अनेकांचं लक्ष वेधलं आहे, कारण यामध्ये अभिनेत्रीने तिच्या आई-वडिलांबरोबरचे काही जुने फोटो पोस्ट केले आहेत.
‘आई कुठे काय करते’मध्ये अरुंधतीच्या धाकट्या सुनेची आरोहीची भूमिका साकारणारी अभिनेत्री कौमुदी वलोकरने हे खास फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये ती तिच्या आई-वडिलांसह पाहायला मिळत आहे. कौमुदीने तिच्या लहानपणातील हा गोड फोटो शेअर केला आहे. या फोटोसह तिने तिच्या वडिलांबरोबरचा अजून एक फोटो शेअर केला आहे. कौमुदीने या पोस्टला खास कॅप्शनही दिलं आहे.
कौमुदी अभिनयासह सोशल मीडियावरही विशेष सक्रिय असते. तिच्या दैनंदिन आयुष्यातील घडामोडी ती सोशल मीडियामार्फत शेअर करत असते. अभिनेत्री शेवटची ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत झळकली होती. यातील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. तिने तिच्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.
कौमुदीच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर तिने २६ डिसेंबर २०२४ रोजी आकाश चौकसेसह लग्नगाठ बांधली होती. अभिनेत्रीच्या लग्नाला इंडस्ट्रीतील अनेकांनी हजेरी लावली होती. आता जवळपास तिच्या लग्नाला सहा महिने झाले आहेत. नुकतीच कौमुदी तिच्या नवऱ्यासह ट्रीपवर गेली होती. यावेळी तिने तिथले काही खास फोटोजही सोशल मीडियावर शेअर केले होते.
दरम्यान, कौमुदीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने आजवर ‘शटर’, ‘मी वसंतराव’, ‘शाळा’, ‘वाय झेड’, ‘तुझ्या माझ्यात’ यांसारख्या चित्रपटांत काम केलं आहे. यासह तिने ‘आई कुठे काय करते’ व ‘देवा शप्पथ’ या मालिकांमध्येही काम केलं आहे, त्यामुळे आता कौमुदी यानंतर कोणत्या नवीन भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार हे पाहणं रंजक ठरेल.