‘आई कुठे काय करते’ ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अभिनेत्री रुपाली भोसले यामध्ये संजना ही भूमिका साकारत आहे. ती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सध्या अभिनेत्रीने शेअर केलेल्या अशाच एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

रुपाली सध्या ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यग्र असल्याने तिने सेटवरच होळीचं अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन केलं आहे. सेटवरच्या मेकअपरुमध्ये तिने कृत्रिम होळी बनवून त्याच्या आजूबाजूला होळीचे रंग सजवले आहेत. पूर्णवेळ शूटिंग असल्याने तिने सेटवर होळी बनवत तिच्या चाहत्यांना सणानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : Video : “माझं नाव करिश्मा नाही…”, लोलोचा खुलासा ऐकून सगळेच झालं थक्क, अभिनेत्रीच्या नावाचा उच्चार नेमका आहे तरी काय?

“होळीच्या पवित्र अग्निमध्ये, निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो, अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो. होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा! आज शूटिंग सकाळी ७ पर्यंत असल्यामुळे घरी पोहचेपर्यंत होळी दहन झालेलं असेल कदाचित…पण, हा शूटिंगचा सेट म्हणजे माझं घरच आहे.. म्हणून ही पूजा केली आणि आईने पुरणपोळी पाठवली मग नैवेद्य दाखवला. खूपच छान आणि प्रसन्न वाटलं… पुन्हा एकदा होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!” अशी पोस्ट रुपाली भोसलेने शेअर केली आहे.

हेही वाचा : प्रथमेश परबच्या लग्नाला १ महिना पूर्ण! बायकोने शेअर केली रोमँटिक पोस्ट; पाहा Unseen फोटो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रुपालीने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव करत अभिनेत्रीला होळी व रंगपंचमी सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सेटवर असूनही आपली संस्कृती जपल्याने रुपालीचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.