मराठीसह हिंदी मालिकाविश्वात स्वतःच्या दमदार अभिनयाने वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले. ‘बड़ी दूर से आये है’ या हिंदी मालिकेतून घराघरात पोहोचलेली रुपाली सध्या ‘आई कुठे काय करते’ मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेत तिने उत्कृष्टरित्या खलानायिका म्हणजे संजनाची भूमिका साकारली आहे. आज रुपाली संजना म्हणून अधिक ओळखली जात आहे. अशा या लोकप्रिय अभिनेत्रीने दिवाळीच्या मुहूर्तावर नवी आलिशान गाडी खरेदी केली आहे. याचा व्हिडीओ तिने नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे.

यंदाच जून महिन्यात अभिनेत्री रुपाली भोसलेची स्वप्नपूर्ती झाली. तिने मुंबईत स्वतःचं हक्काचं घर घेतलं. या घराची वास्तुशांती तिने पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या थाटामाटात घातली होती. रुपालीच्या घराच्या वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी खास उपस्थिती लावली होती. याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा – सातत्याने येणाऱ्या धमक्यांदरम्यान सलमान खान पोहोचला हैदराबादमध्ये; भाईजान ताज फलकनुमा पॅलेसमध्ये करणार ‘सिकंदर’ चित्रपटाचं चित्रीकरण

मुंबईतील घरानंतर आता रुपालीने नवी आलिशान गाडी खरेदी केली आहे. “आमच्या घरी स्वागत आहे”, असं कॅप्शन लिहित तिने नव्या गाडीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रुपाली आपल्या कुटुंबासह पाहायला मिळत आहे. यात रुपाली मराठमोळ्या लूकमध्ये दिसत आहे. तिने सुंदर साडी नेसली आहे. आपल्या आई-बाबांच्या हस्ते तिने नव्या आलिशान गाडीचं स्वागत केलं आहे. रुपालीच्या नव्या गाडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर काही मिनिटांचं व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – Bigg Boss 18: आता ‘बिग बॉस १८’चं होस्टिंग करणार रवि किशन, सलमान खानची घेतली जागा? नेमकं काय घडलंय? वाचा…

अभिनेत्री रुपाली भोसलेने नवी गाडी खरेदी केल्यानिमित्ताने इतर कलाकार मंडळींसह तिचे चाहते शुभेच्छा देत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “तुझा शून्यापासून ते इथंपर्यंतचा प्रवास आहे. तू खरंच आमच्यासाठी प्रेरणादायी आहे.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “एक महिला आपल्या घरासाठी खूप काही करू शकते.” तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, रे वाह खूप छान. अभिनंदन आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

हेही वाचा – Video: ‘वहिनी’ हाक मारताच लाजली निक्की तांबोळी, अरबाज पटेलबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘स्टार प्रवाह’ची लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मध्ये रुपाली आधी संजना ही भूमिका अभिनेत्री दिपाली पानसरेने साकारली होती. पण काही काळानंतर दिपालीने प्रेक्षकांचा निरोप घेतला आणि तिच्या जागी रुपालीची एन्ट्री झाली. दिपाली प्रमाणे तितक्याच ताकदीने रुपाली ही भूमिका पेलेली. यासाठी तिला सर्वोकृष्ट खलनायिकेचा देखील पुरस्कार मिळाला होता. पण, आता संजनाची ही लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. साडे चार वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या जागी नवी मालिका येणार आहे. अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेते मंगेश कदम यांची प्रमुख भूमिका असलेली ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ मालिका २ डिसेंबरपासून २.३० वाजता प्रसारित होणार आहे.