Aai Kuthe Kay Karte Off Air : ‘आई कुठे काय करते’ मालिकेने तब्बल ५ वर्षांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात होता. अरुंधती, यश, आप्पा, अनघा अशा मालिकेतील सगळ्याच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली होती. गेली अनेक वर्षे ही मालिका सुरू असल्याने कलाकारांना सुद्धा शूटिंगच्या शेवटच्या दिवशी अश्रू अनावर झाले होते.

‘आई कुठे काय करते’ ( Aai Kuthe Kay Karte ) मालिकेतल्या शेवटच्या एपिसोडमध्ये अरुंधतीने अनिरुद्धला घराबाहेर काढल्याचा सीन पाहायला मिळाला. अरुंधती अनिरुद्धने केलेल्या सगळ्या चुकांचा पाढा त्याला वाचून दाखवते आणि त्याला संजनासहीत घराबाहेर काढते. “आता यापुढे कोणाची विचारायची हिंमत होणार नाही की, आई कुठे काय करते” एवढं बोलून अरुंधती अनिरुद्धच्या तोंडावर घराचा दरवाजा लावून घेते. यानंतर तिची तिन्ही मुलं येऊन तिला मिठी मारतात आणि मालिकेचा शेवट होतो. हा एपिसोड प्रदर्शित झाल्यावर मालिकेत काम करणाऱ्या सगळ्या कलाकारांनी भावनिक पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा : नव्या मालिकांची नांदी! ‘झी मराठी’वर सुरू होणार ‘ही’ थ्रिलर मालिका; जबरदस्त VFX ने वेधलं लक्ष, पाहा पहिली झलक

मधुराणी प्रभुलकरची पोस्ट

अरुंधतीची भूमिका साकारणाऱ्या मधुराणी प्रभुलकरने मालिकेतील ( Aai Kuthe Kay Karte ) काही गोड क्षणांचा व्हिडीओ शेअर करत पोस्ट लिहिली आहे. “आई कुठे काय करते मालिकेचा प्रवास आज थांबला. पण, तो संपला नाही… कारण, ‘आई’ हे तत्व आहे… ते कसं संपेल? ते तत्व अनेक वर्षं असंख्य जणांच्या मनात घर करून राहणार आहे. मायबाप प्रेक्षकांचे आणि त्या विधात्याचे संपूर्ण टीमकडून मी पुन्हा एकदा आभार मानते!!!”

इशाची भूमिका साकारणाऱ्या अपूर्वा गोरेची पोस्ट

तसेच अरुंधतीची लेक इशाची भूमिका साकारणाऱ्या अपूर्वा गोरेने देखील पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “खूप प्रेम खूप Gratitude. ५ वर्ष! इशा, आई कुठे काय करते… अचानक आले आणि आयुष्य बदलून गेलं. खूप शिकले, पडले, रडले, उठले, सावरलं. आता पुढची वाटचाल सुरू. खूप लोकांना थँक्यू म्हणायचं आहे. ५ वर्षांत इतकी नाती जोडली गेली की, आपल्या माणसांचे आभार मानून परकं करायचं नाहीये. भावना खूप आणि शब्द कमी असं झालंय. पुढेही मेहनतीने आणि प्रामाणिकपणे काम करेन हे Promise. भेटूच… काळजी घ्या.”

हेही वाचा : अक्षराची मोठी फसवणूक! भुवनेश्वरीच्या प्लॅनमध्ये अधिपती सामील? मास्तरीण बाई भावुक…; पाहा प्रोमो

View this post on Instagram

A post shared by Apurva (@apurvagore)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मालिकेतील ( Aai Kuthe Kay Karte ) कलाकारांसह अनेक प्रेक्षक सुद्धा मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाल्यावर भावुक झाल्याचं मधुराणीने तिच्या इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये सांगितलं आहे. आता हे कलाकार पुन्हा कोणत्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहे.