‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेले अभिनेते मिलिंद गवळी हे कायमच चर्चेत असतात. या मालिकेत ते अनिरुद्ध देशमुख ही व्यक्तिरेखा साकारताना दिसतात. या मालिकेमुळेच ते घराघरात पोहोचले. सध्या ही मालिका टीआरपीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पाहायला मिळत आहे. नुकतंच मिलिंद गवळी यांनी त्यांनी सिनेसृष्टीत येण्याचा निर्णय का घेतला? याबद्दल सांगितले आहे.

मिलिंद गवळी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ते इन्स्टाग्रामद्वारे फोटो-व्हिडीओ पोस्ट करत असतात. नुकतंच त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत ते जंगलात फिरताना दिसत आहेत. मिलिंद गवळींनी शेअर केलेल्या या पोस्टला दिलेल्या कॅप्शनने लक्ष वेधलं आहे.
आणखी वाचा : नागराज मंजुळेंनी मराठी भाषेबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्यानंतर मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले “मराठीवर प्रभुत्व असणारी…”

Supriya Sule, Amol Kolhe, Ajit Pawar taunt,
खासदार डॉ. अमोल कोल्हे हे एक सुसंस्कृत लोकप्रतिनिधी – सुप्रिया सुळे
Orenthal James Simpson
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?
Pankaja munde and jyoti mete
बीडमध्ये तिहेरी लढत? पंकजा मुंडेंसमोर आता ज्योती मेटेंचंही आव्हान; मविआनं डावलल्यानंतर म्हणाल्या, “पुढची पावलं…”
girish mahajan statement on bjp mp unmesh patil
खासदार उन्मेश पाटील यांना चुकीची जाणीव होईल; गिरीश महाजन यांचा सूचक इशारा

मिलिंद गवळींची पोस्ट

“मै चला अकेला, रास्तों पे”
मेरे पीछे कोई भी नहीं है, मेरे जो है सपने वही तो है अपने,
आपण जेव्हा शाळेत असतो त्या वेळेला आपण मोठं व्हायची स्वप्न बघत असतो , मोठा झाल्यानंतर आपल्याला काय व्हायचं हे ? ठरवत असतो . लोकांकडे बघतो , त्यांचं आयुष्य बघतो आणि आपल्याला असं वाटतं आपण यांचे सारखं व्हावं, मी लहानपणी बघितलेली माणसं, त्या माणसांन मद्धे, मला बहुतेक सगळीच माणसं आवडायची , फक्त आमच्या घरी एक पॉलिटिशन politician यायचे, ते आमचे नातेवाईक होते, ते आले की घरा मधलं वातावरणच बदलून जायचं , सगळ्यांनची धावपळ, सगळे आपलं काम सोडून त्यांची वाट बघत बसायचे, ते आले की त्यांना खूप भाव मिळायचा, पण त्यांना भेटलं की मला एक खूप माज असलेला अहंकारी माणूस त्यांच्यामध्ये दिसायचा, तेव्हाच मी ठरवलं होतं की आयुष्यामध्ये कधीही असं पॉलिटिशन politician व्हायचं नाही,

वडील पोलीस खात्यात असल्यामुळे असंख्य पोलीस officers यायचे, बरेचसे चांगले प्रेमळ असायचे पण काहींमध्ये परत तोच माज असायचा, मग आपण पोलीस ऑफिसर झालो तर वडिलांसारखा चांगला ऑफिसर व्हायचं असं मनामध्ये ठरवलं, पण माझं डोकं तापट होतं, त्यामुळे आपल्याला चांगला प्रेमळ वगैरे होता येणार नाही , आपण खूप हाणामाऱ्याच करू , जर आपण पोलीस झालो तर , याची मला खात्री होती. पोलीस स्टेशनच्या वरती राहायचो आम्ही, त्यामुळे शाळेमध्ये जाताना येताना खाली बऱ्याचशा आरोपींची सुद्धा ओळख व्हायची माझी, अंडरवर्ल्डचे लोकं असायचे ते , पण त्यांच्याकडे बघून मला, आपण कधीच अंडरवर्ल्डमध्ये जायचं नाही , असंच मनाने ठरवून टाकलं होतं.

सिनेमे बघायला जायचो कधी कधी, त्यामुळे पडद्यावरचे विश्व फारच वेगळं आणि भन्नाट वाटायचं, त्या विश्वात जर आपल्याला जायला मिळालं तर किती मजा येईल, पण तिकडे कसं जातात हे काहीच माहिती नव्हता, हिरोज पडद्यावर करतात ते सगळे आपल्याला यायला हवं, अमिताभ बच्चन ने मुकद्दर का सिकंदर मध्ये हात सोडून मोटरसायकल चालवलतो मग तशी हात सोडून मोटर सायकल चालवायला शिकलो , मेरा गाव मेरा देश मध्ये विनोद खन्ना घोडा चालवतो , मग घोडा चालवायला पण शिकलो, पोहायला शिकलो,

आपल्याला जे जे सुचेल ते ते सगळ करायची तयारी होती, पण त्या पडद्यावर जायचं, पुढे सगळा अंधारच होता, पण आपण त्या रस्त्यावर चालायचं, मार्ग शोधून काढायचा, दहावीत असताना एकदा शूटिंग बघायला गेलो, आणि छोटासा प्रकाश दिसला, “हम बच्चे हिंदुस्तान के” नावाचा चित्रपट होता , तो माझा पहिला चित्रपट, ते डायरेक्टर्स कट प्रोडक्शन चं“आई कुठे काय करते “ प्रवास चालूच आहे, मार्ग काढत, चाचपडत धडपडत, अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे”, असे मिलिंद गवळींनी म्हटले आहे.

आणखी वाचा : ‘झी मराठी’ वाहिनीचा टीआरपी वाढवण्यासाठी मोठा निर्णय, ‘या’ जुन्या मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

दरम्यान मिलिंद गवळी यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. मिलिंद गवळी गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी मराठीसह हिंदी माध्यमांमध्येही काम केले आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली. या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यानचे फोटो, व्हिडीओ ते सतत सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.