स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. या मालिकेत अरुंधतीची सर्वात जवळची आणि लाडकी मैत्रीण म्हणजे देविका. यात देविका हे पात्र अभिनेत्री राधिका देशपांडे साकारत आहे. नुकतंच तिच्या एका पोस्टने लक्ष वेधून घेतले आहे.

राधिका देशपांडे ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्यांनी जुन्या काही पुस्तकांची झलक दाखवली आहे.
आणखी वाचा : “कशाला पाहिजे टिकली फिकली…” मराठी अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

राधिका देशपांडे पोस्ट

“गेले होते काळा रामाचे दर्शन घ्यायला. पण तिथे खजिनदार भेटले.

डॉ. श्री वैद्य, जगात अशीही माणसं असतात हे माहीत होते पण त्यांचा खजिना त्यांच्या घरी जाऊन बघता येईल, सोन्या चांदीहून अधिक मौल्यवान अशी हस्त लिहीत पुस्तकं, पोथ्या बघता येतील असे वाटले नव्हते. पेटंट असलेले, रेकॉर्ड होल्डर; श्री वैद्य अत्यंत साधे.
इंस्टा वर त्यांची सौ., अश्विनी वैद्य शी ओळख झाली. काळा रामाला भेट द्या. तिथे आमचे ‘ हे‘ पौरोहित्य करतात. अभ्यासपूर्ण माहिती मिळेल. मी संपर्क साधला. माऊली नी ओटी भरली, जेवल्याशिवाय पाठवले नाही.

पाटलीपुत्रातले विद्यापीठ मुघलांनी जाळून टाकले हे इतिहास जमा आहे पण श्री वैद्यांसारखे राखणदार वारंवार जन्माला येत असतात. पूर्वजांची मालमत्ता संग्रही ठेवतात आणि संगोपन करतात आणि ही विद्या अधिकाधिक प्रवाहित व्हावी म्हणून हस्तलिखित पोथ्या, पुस्तकं डिजिटलाईज करून घेतात हे आजचे वर्तमान. पुरातन काळातल्या पोथ्यान बद्दल बोलताना त्यांची ओघवती, स्वच्छ आणि सुंदर वाणी ऐकत रहाविशी वाटतं होती. ह फक्त ती समजायला आपल्या बुद्धीवरची धूळ, जळमटं तेवढी साफ करून घ्यावी लागली. आणखीन बरच काही आहे नाशकात. आज एवढेच सांगावेसे वाटते की, अशी माणसं आपण जपली पाहिजेत. धन्यवाद”, असे राधिका देशपांडेने म्हटले आहे.

दरम्यान राधिका सध्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत दिसत नाही. त्यामुळे तिने ही मालिका सोडल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत विविध ट्विस्ट पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा : “तू पुन्हा केस कापलेस…” अमृता खानविलकरच्या नव्या लूकवर सोनालीची कमेंट, अभिनेत्री प्रतिक्रिया देत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राधिकाने यापूर्वी अनेक मराठी नाटक आणि चित्रपटात काम केली आहे. ‘व्हेनिला स्ट्राबेरी अँड चॉकेलट’, ‘होणार सून मी या घरची’, ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ सारख्या प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केलं आहे.